कोहलीच्या स्वप्नातलं घर पुढच्या वर्षी साकारणार

कोहली सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आपले स्वप्नातील घर वसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या आपल्या स्वप्नातील घरात जाण्यासाठी कोहली वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 15:09 IST2018-03-12T14:34:26+5:302018-03-12T15:09:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kohli's dream house will be held next year | कोहलीच्या स्वप्नातलं घर पुढच्या वर्षी साकारणार

कोहलीच्या स्वप्नातलं घर पुढच्या वर्षी साकारणार

ठळक मुद्देसध्या 15 लाख रुपये देऊन राहतोय मुंबईतील वरळीच्या घरात

मुंबई : प्रत्येकाचं आपल्या घराचं एक स्वप्न असतं. ते घरं कसं असावं, त्यामध्ये काय असावं, कोण असावं, हे सारं मनात प्रत्येकाने ठरवलेलं असतं. भारताचा कर्णधार विराट कोहलीही या गोष्टीला अपवाद नाही. कोहली सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आपले स्वप्नातील घर वसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या आपल्या स्वप्नातील घरात जाण्यासाठी कोहली वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईतील वरळी भागामध्ये कोहलीने आपल्यासाठी एक बंगला बूक केला आहे. वरळीमध्ये स्काय बंगलो नावाचा प्रोजेक्ट सुरु आहे. त्यामध्ये कोहलीने आपला बंगला बुक केला आहे. सध्या त्याच्या या बंगल्याच्या बांधकामाचे काम सुरु आहे. त्यामुळे तब्बल 15 लाख रुपये भरून कोहली वरळीमधील एका टॉवरमध्ये राहत आहे. यासाठी त्याने तब्बल दीड कोटी रुपये डीपॉझिट भरले आहे.

सध्या कोहली वरळी येथील एका टॉवरच्या 40व्या मजल्यावर राहत आहे. काही दिवसांपूर्वी कोहलीने आपल्या बाल्कनीमधून घेतलेला एक फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. रविवारी कोहलीने पत्नी अनुष्कासोबतचा फोटोही समाजमाध्यमांवर शेअर केला होता.

कोहलीने 2016 साली वरळीमधील स्काय बंगलो प्रोजेक्टमध्ये आपला बंगला बूक केला होता. हा बंगला 8 हजार स्क्वेअर फूटचा असेल. पण सध्या त्याचा  रहेजा लिजंड टॉवरमधील रुम 2675 स्क्वेअर फूटचा आहे. हे घर त्याने 24 महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे.

Web Title: Kohli's dream house will be held next year