Join us

कोहलीची अनुपस्थिती निराशादायी, मात्र आम्ही दावेदार नाही - लियोन

‘भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू असल्यामुळे विराटच्या अनुपस्थितीतही ही मालिका चुरशीची होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 01:25 IST

Open in App

मेलबोर्न : विराट कोहली अखेरच्या तीन कसोटीत खेळणार नाही हे निराशादायी आहे, त्याचवेळी ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत विजयाचा प्रबळ दावेदार मानणार नाही, असे अनुभवी फिरकीपटू नॅथन  लियोन याने स्पष्ट केले.

‘भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू असल्यामुळे विराटच्या अनुपस्थितीतही ही मालिका चुरशीची होणार आहे. विराट खेळणार नाही, हे मनाला न पटणारे आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन प्रमाणेच तोदेखील सर्वोत्तम फलंदाज आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या चिवट फलंदाजांसह काही युवा फलंदाज चमक दाखविण्यास सज्ज असल्याने आमच्यापुढे अवघड आव्हान असेल,’ असे मत लियोनने व्यक्त केले.

विराट खेळणार नाही, याचा अर्थ असा नव्हे की आम्हीच चषक जिंकणार. मालिका जिंकण्यासाठी प्रत्येक आघाडीवर कठोर मेहनत घ्यावी लागेल. ७० दिवस चालणारी ही मालिका म्हणजे आमच्यासाठी परीक्षेचा काळ असेल, असेही लियोन म्हणाला. फलंदाजांसह काही युवा फलंदाज चमक दाखविण्यास सज्ज असल्याने आमच्यापुढे अवघड आव्हान असेल,’ असे मत लियोनने व्यक्त केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया