Join us  

धक्कादायक! कोहलीची विकेट लागली त्याच्या जिव्हारी, घेतले स्वत:ला पेटवून

भारतात क्रिकेटर्सची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. क्रिकेटर्सचे फॅन्सही खूप आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी ते काहीही करायला तयार असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 2:22 PM

Open in App

भोपाळ - भारतात क्रिकेटर्सची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. क्रिकेटर्सचे फॅन्सही खूप आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी ते काहीही करायला तयार असतात. सध्याचे भारतीय क्रिकेटमधील आघाडीचे नाव म्हणजे विराट कोहली. त्याचे फॅन्सही भारतातच नाही तर जगभरात आहेत. विराट कोहलीच्या अशाच एका चाहत्याने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीचं नाव बाबूलाल बैरवा आहे. 63 वर्षीय बाबूलाल मध्य प्रदेशमध्ये राहतात.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट स्वस्तात बाद झाल्यानंतर नाराज होऊन या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूलाल घरी टीव्हीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कसोटी सामना पाहत होते. या सामन्यात कर्णधार विराट कोहली अवघ्या 5 धावांवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर बाबूलाल यांनी स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. मात्र त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या अंगावर कपडे टाकून आग विझवली. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

(आणखी वाचा : सनथ जयसूर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय येत नाही चालता )

दरम्यान,  पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यानंतर दिवसाखेर भारतीय फलंदाजांच्या हराकिरीमुळं भारत बॅकफूटवर ढकलला गेला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं सर्वबाद 209 धावा केल्या होत्या. तर दिवसाखेर आफ्रिकेनं दोन बाद 65 धावा केल्या. सध्या भारत 142 धावांनी पिछाडीवर आहे. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळ पावसामुळं उशीरा सुरु होण्याची शक्याता आहे. कदाचीत पावसामुळं भारतीय गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.  

( आणखी वाचा : पहिल्या कसोटीपूर्वीच द. आफ्रिकेनं केला भारताचा अपमान, तुम्हालाही येईल राग )

विराटचा जबरा फॅन मानणाऱ्या एका चाहत्यानं विराट कोहलीला पाहण्यासाठी आपल्या आईचे दागीने विकल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याचे नाव निकाश असून तो ओडिसाचा आहे. निकाश आतापर्यंत चार वेळा कोहलीला भेटलाय. तो स्वत:ला विराटचा मोठा चाहता मानतो. यासाठी त्याने आपले कामही सोडून दिलेय. 

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८