श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०त कोहलीचे खेळणे अनिश्चित

श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे टी-२० मालिकेत खेळणेही निश्चित नाही. विराट संघव्यवस्थापन व निवड समितीसोबत या विषयावर चर्चा केल्यानंतर आपल्या सहभागाबाबत निर्णय घेईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:56 IST2017-11-29T01:56:06+5:302017-11-29T01:56:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kohli playing in the T20 against Sri Lanka is uncertain | श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०त कोहलीचे खेळणे अनिश्चित

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०त कोहलीचे खेळणे अनिश्चित

नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे टी-२० मालिकेत खेळणेही निश्चित नाही. विराट संघव्यवस्थापन व निवड समितीसोबत या विषयावर चर्चा केल्यानंतर आपल्या सहभागाबाबत निर्णय घेईल.
संघनिवडीबाबत माहिती ठेवणाºया बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, की राष्ट्रीय निवड समिती व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कोहली यांचा समावेश असलेले संघ व्यवस्थापन या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिका दौºयातील कसोटी मालिकेसाठी संघ निवड या मुद्यावर चर्चा करेल. द. आफ्रिका दौºयाच्या तयारीला वेळ मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर कोहलीने चिंता व्यक्त केल्यानंतर काही कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी तेथे लवकर पाठविता येईल किंवा नाही, याची चाचपणी करण्यात येईल. श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामने २०, २२ व २४ डिसेंबर रोजी अनुक्रमे कटक, इंदूर व विशाखापट्टणम येथे खेळले जाणार आहेत. निवड समितीच्या बैठकीदरम्यान दक्षिण आफ्रिका दौºयाच्या तयारीबाबत विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

१२ डिसेंबरपर्यंत विराट खासगी व्यस्ततेमध्ये आहे. त्यानंतर विश्रांती घेणार की टी-२० खेळणार, हा सर्वस्वी त्याचा निर्णय राहील.
‘विराटने निवड समितीला सांगितले, ‘टी-२० मध्ये खेळणार किंवा नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी मला वेळ हवा आहे. याच कारणामुळे समितीने टी-२० संघाची घोषणा केलेली नाही.’

Web Title: Kohli playing in the T20 against Sri Lanka is uncertain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.