Join us
Daily Top 2Weekly Top 5

दशकातील कसोटी संघाचे नेतृत्त्व कोहलीकडे

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सोमवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीची दशकातील ऑल स्टार कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड केली. त्याच्या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:53 IST

Open in App

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सोमवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीची दशकातील ऑल स्टार कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड केली. त्याच्या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. पाँटिंगने गेल्या दहा वर्षांतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या संघात कोहली व्यतिरिक्त अन्य कोणीही भारतीय नाही. कोहली सध्या कसोटी व एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.इंग्लंडच्या खेळाडूंपैकी या संघात अष्टपैलू बेन स्टोक्स, सलामीवीर अ‍ॅलिस्टर कूक, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व फिरकीपटू नॅथन लियोन यांनाही स्थान मिळाले.पाँटिंगने टिष्ट्वटरवर लिहिले की, ‘प्रत्येकजण दशकातील आपला संघ निवडतो. त्यामुळे मी सुद्धा यात सहभागी झालो. माझ्या कसोटी संघात डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅलिस्टर कूक, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), कुमार संगकारा (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लियोन, स्टुअर्ट ब्रॉड. जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे.’

टॅग्स :विराट कोहली