दुबई : लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले असून शिखर धवन मात्र विंडीजविरुद्ध खराब कामगिरीमुळे चार स्थानांनी खाली घसरला. त्याचवेळी, विराट कोहली फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर कायम असून रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विंडीजविरुद्ध पाच डावांमध्ये अर्धशतकापासून वंचित राहिलेला पाचव्या स्थानावरील धवन नवव्या स्थानावर घसरला.गोलंदाजांत चहल आठव्या स्थानी असून श्रीलंकेचा अकिला धनंजय १३ व्या आणि रवींद्र जडेजा १६ व्या स्थानी आहे. एकदिवसीय संघांमध्ये इंग्लंड नंबर वन असून भारत दुसºया स्थानी आहे. न्यूझीलंडला तिसरे स्थान मिळाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयसीसी क्रमवारीत कोहली, रोहित पहिल्या दोन स्थानी
आयसीसी क्रमवारीत कोहली, रोहित पहिल्या दोन स्थानी
विराट कोहली फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर कायम असून रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:11 IST