Join us

युवा खेळाडूंना कोहली आकर्षित करतोय - प्रवीण आमरे

सध्या खेळासाठी फिटनेस ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी खेळाडू मेहनत घेतात. विराटकडून हे शिकण्यासारखे आहे, असे भारतीय संघाचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 00:28 IST

Open in App

मडगाव  - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी-२०, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याने तंदुरूस्ती राखण्याचा नवा पायंडा पाडला आहे. तो फिटनेसवर खूप भर देतो. सध्या खेळासाठी फिटनेस ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी खेळाडू मेहनत घेतात. विराटकडून हे शिकण्यासारखे आहे, असे भारतीय संघाचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले. 

ते एका कार्यक्रमानिमित्त गोव्यात आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी गोवा क्रिकेटचे आश्रयदाते दिनेश त्रिकन्नाड, ओमकार भंडारी, कौशल हट्टंगडी, सनथ नेवगी, शुभम गंजीकर व शशांक वेरेकर उपस्थित होते. आमरे म्हणाले, कर्णधार विराट कोहलीच्या मागदर्शनाखाली भारतीय संघाची वाटचाल विश्वचषकाच्या दिशेने सुरू आहे. सध्या विराट हा तिन्ही फॉरमेटमध्ये उत्कृष्टपणे खेळत आहे. अशी कामिगिरी कायम राखल्यास तो निश्चितपणे विक्रमांना गवसणी घालेल. त्याच्या फिटनेस ट्रेंडममुळे क्रिकेटला नवी दिशा प्राप्त झाली आहे. युवा खेळाडूंनाही तो आकर्षित करतो. गोव्यातील क्रिकेटपटूंना आमरे यांनी मंत्र दिला. 

ते म्हणाले, गोव्याच्या खेळाडूंना प्रगती साधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावर छाप सोडावी लागेल. स्वत:ला सिद्ध करा तेव्हाच तुम्हाला संधी प्राप्त होईल. खेळात सातत्यही महत्त्वपूर्ण ठरते. खेळाडूंना चांगल्या सुविधा आणि उत्तम प्रशिक्षकही तेवढेचे महत्त्वाचे ठरतात. मात्र, त्यावर अवलंबून न राहता स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करा. 

दरम्यान, प्रवीण आमरे सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे साहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांनी गोवा प्रीमियर लीग चषक स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र व गोवा यांच्यात सामने झाल्यास गोव्यातील खेळाडूंची कामगिरी उंचावण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सागितले.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट