Join us

कोहली क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो : ब्रायन लारा

लोकेश राहुलही प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:07 IST

Open in App

विशाखापट्टणम : ‘विराट कोहलीची खेळाप्रती असलेली समर्पितवृत्ती पाहता सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची आठवण होते. कोहली हा क्रिकेटचा रोनाल्डोच आहे,’ अशा शब्दांत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा याने कोहलीचे कौतुक केले. ‘लोकेश राहुल हा देखील समर्पित भावनेत कोहलीसारखाच आहे,’ असेही लारा म्हणाला.फलंदाजीत अविश्वसनीय कामगिरी करण्यासाठी कोहलीने स्वत:चा खेळ उच्च दर्जापर्यंत नेण्याबाबत मी कोहलीचा चाहता असल्याचे लाराने सांतिगले. तो पुढे म्हणाला, ‘विराटची तयारी आणि क्रिकेटप्रती त्याची समर्पित भावना वादातीत आहे. तो लोकेश राहुल किंवा रोहित शर्मापेक्षा अधिक प्रतिभावान आहे, असे नाही, पण स्वत:ला सज्ज करण्याची त्याची तयारी या दोघांच्या तुलनेत फारच वेगळी आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा स्तर खूप उच्च आहे.’कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजारावर धावा काढणारा लारा म्हणाला, ‘कोहली हा कोणत्याही युगातील सर्वोत्कृष्ट संघात स्थान मिळवू शकतो. तो क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखालील १९७० च्या दशकातील संघो असो वा सर डॉन ब्रॅडमन यांचा १९४८ चा विश्वविजेता संघ असो. विराटचे फलंदाजीतील कौशल्य अप्रतीम आहे. त्याला कुठल्याही संघातून वगळले जाऊ शकणार नाही. खेळातील प्रत्येक प्रकारात त्याच्या धावांची सरासरी ५० आहे.’ (वृत्तसंस्था)वेस्ट इंडिज क्रिकेटबाबत लारा म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडूची स्वत:ची आवड असते. १९७० च्या दशकात कॅरी पॅकर युगातही हेच दिसायचे. प्रत्येकजण विंडीज संघात स्थान मिळवत नसेल आणि टी२० त पैसा मिळत असेल तर काय हरकत आहे. आमचे खेळाडू वेस्ट इंडिज बोर्डाला सेवा देण्याविरुद्ध नाहीत, मात्र त्यांच्या सेवेची किती गरज आहे, हे वेस्ट इंडिज बोर्डाने ठरवावे.’

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज