Join us

कोहली आणि जडेजामध्ये लागली रेस; पाहा नेमकं कोण जिंकलं?

फिटनेससाठी भारताचा कर्णधार विराट कोहली हा अथक मेहनत घेतो. बराच वेळ तो जिममध्ये व्यतित करतो. भारतीय संघात सर्वात फिट खेळाडू हा कोहलीच असल्याचे म्हटलेही जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:55 IST

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात एक अशी गोष्ट घडली की ती पाहून संघात तंदुरुस्त खेळाडू कोण, याचे काहींना उत्तर मिळाले.

मुंबई  : वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा सामना रोहित शर्माने चांगलाच गाजवला. रोहितच्या 162 धावांची दमदार खेळी भारताला दणदणीत विजय मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरली. पण या सामन्यात एक अशी गोष्ट घडली की ती पाहून संघात तंदुरुस्त खेळाडू कोण, याचे काहींना उत्तर मिळाले.

फिटनेससाठी भारताचा कर्णधार विराट कोहली हा अथक मेहनत घेतो. बराच वेळ तो जिममध्ये व्यतित करतो. भारतीय संघात सर्वात फिट खेळाडू हा कोहलीच असल्याचे म्हटलेही जाते. या सामन्यात कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये यांच्यामध्ये रेस लागली होती.

रोहितच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने 377 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरला होता आणि पहिल्याच षटकात कोहली आणि जडेजा यांच्यामध्ये रेस पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा सलामीवीर चंदरपॉल हेमराजने एक फटका मारला. तो फटका अडवण्यासाठी कोहली आणि जडेजा हे दोघे धावत होते. पण यावेळी जडेजाने कोहलीला मागे टाकल्याचेच दिसले.

हा पाहा रेसचा व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहलीरवींद्र जडेजारोहित शर्मा