Join us

Koffee With Karan: हार्दिक पंड्याला 'या' बॉलीवूड अभिनेत्रीशी करायचे आहे लग्न...

हार्दिकने सांगितले की, मला चिकनी चमेली हे आयटम साँग आवडते, त्यामुळे मला करिना कपूरबरोबर डेटिंगला जायला आवडेल. तर आपल्याला प्रियांका चोप्राही आवडत असल्याचे हार्दिकने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:47 IST

Open in App

मुंबई : कॉफी विद करण, या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेट संघातील हॉट बॉय हार्दिक पंड्या गेला होता. यावेळी हार्दिकबरोबर लोकेश राहुलचीही मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये हार्दिक आणि राहुल या दोघांनीही कोणत्या बॉलीवूडमधल्या कोणत्या अभिनेत्री आवडतात, त्यांच्याबरोबर डेटिंग किंवा लग्न करायला आवडेल, असे बरेच प्रश्न विचारले गेले आणि या दोघांनीही दिलखुलासपणे उत्तर दिली.

क्रिकेटच्या मैदानात हार्दिकने दमदार कामगिरी केली आहे. पण प्रणयाच्या मैदानाबाबत त्याने फारसे भाष्य केले नव्हते. पण कॉफी विद करण या कार्यक्रमामध्ये मात्र हार्दिक आणि राहुल यांनी थेट उत्तर दिली आहेत.

करण जोहरच्या एका प्रश्नावर राहुल म्हणाला की,  मला संजू हा सिनेमा फार आवडला. हार्दिकने पण यावेळी, मला संजय दत्तचा अभिनय आवडतो. तो ज्यापद्धतीने कुर्ता आणि पायजमा घालतो, ती त्याची पद्धत मला आवडते, असे सांगितले. लोकेश राहुलने यावेळी, मला मलायका अरोराबरोबर डेटिंगला जायला आवडेल, असेही सांगितले. तर हार्दिकने सांगितले की, मला चिकनी चमेली हे आयटम साँग आवडते, त्यामुळे मला करिना कपूरबरोबर डेटिंगला जायला आवडेल. तर आपल्याला प्रियांका चोप्राही आवडत असल्याचे हार्दिकने सांगितले.

करण जोहरने जेव्हा हार्दिकला विचारले की, तुला कोणत्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीबरोबर लग्न करायला आवडेल? त्यावर हार्दिकने सांगितले की, " मला जर बॉलीवूडमधल्या कोणत्या अभिनेत्रीशी लग्न करायची संधी मिळाली, तर माझे पहिले प्राधान्य परिणीति चोप्राला असेल. " 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6परिणीती चोप्रा