Join us  

रवी शास्त्री यांचीच का झाली प्रशिक्षकपदी नियुक्ती, जाणून घ्या कारण

शास्त्री यांचीच प्रशिक्षकपदी नियुक्ती का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टी माहे एक मोठे कारण दडलेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:27 PM

Open in App

मुंबई : भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. आता २०२१ सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. पण पुन्हा एकदा शास्त्री यांचीच प्रशिक्षकपदी नियुक्ती का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टी माहे एक मोठे कारण दडलेले आहे.

बीसीसीआयने प्रशिक्षक नियुक्तीसाठी माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची स्थापना केली होती. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज सकाळी साडे दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) हेड कोचची निवड करणार आहे. या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या छाननीनंतर सहा शिलेदार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उरलेत. ते आहेत, टॉम मुडी, माईक हेसन, फिल सिमन्स, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि रवी शास्त्री. 

या मुलाखतींनंतर शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जुलै २०१७ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडे दुसऱ्यांदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया २१ कसोटी सामने खेळली आणि त्यापैकी १३ सामने जिंकली. वनडे सामन्यांचा विचार केल्यास, शास्त्री गुरुजींच्या कार्यकाळात झालेल्या ६० सामन्यांपैकी ४३ सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. तसंच, टी-२० मध्येही ३६ पैकी २५ सामन्यांत भारताने विजयोत्सव साकारला आहे. हे एक कारण त्यांच्या नियुक्ती मागचे आहे. पण या नियुक्तीमागे एक मोठे कारण असल्याचेही म्हटले जात आहे.

सल्लागार  समितीतील गायवकाड यांनी शास्त्री यांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ''टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख पाहता शास्त्री यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे शास्त्री वगळता अन्य पदांसाठी पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा आहे. या पदांसाठी बीसीसीआयनं नेमलेल्या अटींची जो पूर्तता करेल, त्याची निवड होईल.''

कॅप्टन विराट कोहलीनेही आपले वजन शास्त्रींच्या तराजूत टाकले होते. त्यामुळे कोहलीची ईच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहलीकपिल देव