फलंदाजाच्या खात्यामध्ये super over मधील धावा जोडल्या जातात का, जाणून घ्या काय सांगतो ICCचा नियम

सुपर ओव्हरबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:34 PM2020-02-01T14:34:22+5:302020-02-01T14:35:38+5:30

whatsapp join usJoin us
Know if the score is added to the batsman's account in the super over, what the ICC rules say | फलंदाजाच्या खात्यामध्ये super over मधील धावा जोडल्या जातात का, जाणून घ्या काय सांगतो ICCचा नियम

फलंदाजाच्या खात्यामध्ये super over मधील धावा जोडल्या जातात का, जाणून घ्या काय सांगतो ICCचा नियम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सध्याच्या घडीला सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे सुपर ओव्हर. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सलग दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली. या दोन्ही सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली. पण सुपर ओव्हरमधील धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात की नाही, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे.

टीम इंडियाविरुद्ध सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं न्यूझीलंडमधले क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. गेल्या दोन टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं तोडीस तोड खेळ केला. मात्र शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये गेले.

Image result for SUPER OVER IN NZ

सुपर ओव्हरचा नियम आयसीसीनं केला असल्यानं त्याला आव्हान कसं द्यायचं असा प्रश्न न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासमोर पडला आहे. त्यावरही न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांनी एक वेगळाच पर्याय क्रिकेट बोर्डाला दिला आहे. भारतीय संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर होऊनही अनेक राज्यांनी त्यांच्या विधानसभांमध्ये कायद्याविरोधात ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं सुपर ओव्हरविरोधात न्यूझीलंडमध्ये ठराव मंजूर करावा, अशी आग्रही मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली आहे.

न्यूझीलंडचा हा सुपर ओव्हरमधील एकूण सातवा पराभव ठरला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. उर्वरीत सहा पराभव हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातील आहेत. 

Image result for SUPER OVER IN NZ

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामना नाट्यमय झाला. मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीला किवींच्या कॉलीन मुन्रोनं तुफान फटकेबाजीनं उत्तर दिलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या क्षणाला झेल सोडल्यानंही सामना किवींच्या पारड्यानं झुकला. किवींनी मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करताना टीम इंडियाच्या घोडदौडीला ब्रेक लावला. मुन्रोनंतर टीम सेइफर्टनं दमदार खेळ केला. त्याच्या अर्धशतकी खेळीला रॉस टेलरची तुल्यबळ साथ मिळाली. अखेरच्या षटकात टेलरच्या विकेटनं सामन्यात चुरस निर्माण केली. टीम सेइफर्टही धावबाद झाला.  त्यानंतर पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेलही झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर एकच धाव घेतल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो
मेरिलीबोन क्रिकेट क्लब (MCC) ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम बनवत असते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या नियमांची अंमलबजावणी लागू करत असते. मेरिलीबोन क्रिकेट क्लबने सुपर ओव्हरबाबतही एक नियम बनवला आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आला आहे.

Image result for SUPER OVER IN NZ

सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक देण्यात येते. त्याचबरोबर दोन्ही संघांतून प्रत्येकी तीन फलंदाज मैदानात उतरू शकतात. या सुपर ओव्हरमध्ये जो जास्त बनवतो तो विजेता ठरतो. सुपर ओव्हर ही फक्त सामन्याचा निककाल लावण्यासाठी खेळवली जाते. पण या सुपर ओव्हरमध्ये केलेल्या धावा फलंदाजाच्या धावसंख्येत जोडल्या जात नाहीत.
 

Web Title: Know if the score is added to the batsman's account in the super over, what the ICC rules say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.