Join us  

खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण

जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:49 PM

Open in App

लंडन : क्रिकेटमध्ये कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यात वेगवेगळे गणवेश घातले जातात. मर्यादीत षटकांच्या सामन्यात रंगीत कपडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात. पण क्रिकेटमधील जर्सीचा नंबर कोणत्या रंगाने लिहायचा हे ठरलेले असते. कसोटी क्रिकेटमध्ये आता जर्सीचा नंबर काळ्या रंगात लिहिला जातो. पण आजपासून सुरु झालेल्या अॅशेस सामन्यात मात्र जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या...

इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याने रुथ स्ट्रॉस फाउंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनद्वारे लोकांना कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण केली जाते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कर्करोग झाला आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी हे फाऊंडेशन घेते. या फाऊंडेशनला समर्थन देण्यासाठी खेळाडूंनी जर्सीचा नंबर लाल रंगात लिहीला होता.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड