Join us  

IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार!

India Tour of England  practice game : रिषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 6:15 PM

Open in App

India Tour of England  practice game : विराट कोहलीच्या नेृत्वाखाली इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या टीम इंडियाची सुट्टी संपली असून उद्यापासून कौंटी क्लब एकादश संघाविरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसीय सराव सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची पूर्वतयारी म्हणून टीम इंडियासाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात बीसीसीआयला यश मिळालं. त्याची सुरूवात उद्यापासून होत आहे. रिषभ पंतला ( Rishabh Pant) मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि तो २२ तारखेला संघासोबत सराव करण्यास उतरेल. त्यामुळे तो पहिल्या सराव सामन्यात खेळणार नाही. ( KL Rahul to keep wicket in warm-up game with Rishabh Pant yet to join Indian squad) 

रिषभ पंतच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल यष्टींमागे दिसणार आहे. कारण, राखीव यष्टिरक्षक वृद्धीमान सहा हाही कोरोना पॉझिटिव्ह सदस्याच्या संपर्कात आल्यामुळे विलगिकरणात आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु त्याला २४ जुलैपर्यंत विलगिकरणातच असणार आहे. त्यामुळे सराव सामन्यात लोकेश यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसेल. सूत्रांनी सांगितले की,''रिषभ पंतला पुन्हा तंदुरूस्ती मिळवण्यासाठी पुरेसा आराम दिला जाणार आहे. त्याच्यात आता आजारपणाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत, परंतु पहिल्या कसोटीत खेळण्यापूर्वी त्याला सरावाची गरज भासणार आहे. रिषभसह वृद्धीमान सहा हाही पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. पण, आता पहिल्या सराव सामन्यात लोकेश राहुल यष्टिरक्षण करेल.''

शुबमन गिलला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत रोहित शर्मासह सलामीला मयांक अग्रवाल अन् लोकेश राहुल ही नावं चर्चेत आहेत. सराव सामन्यात लोकेश यष्टींमागे दिसणार असल्यानं मयांक रोहितसह सलामीला खेळेल. त्यात चांगली कामगिरी केल्यास कसोटी मालिकेत त्याला संधी मिळू शकते.  अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे, तो पुन्हा अपयशी ठरल्यास लोकेशचा मधल्या फळीसाठी विचार होऊ शकतो. कौंटी एकादश संघात सर्व युवा खेळाडू आहेत आणि त्यापैकी एक जेम्स ब्रासे यानेच इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत.  

हा सामना लाईव्ह कुठे पाहाल?

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलरिषभ पंतमयांक अग्रवालशुभमन गिल