Big News : लोकेश राहुल, स्मृती मानधनासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना 'NADA'ची नोटीस

चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांचाही समावेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 04:48 PM2020-06-13T16:48:38+5:302020-06-13T16:49:26+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul, Smriti Mandhana, Ravindra Jadeja among 5 players to get NADA notice | Big News : लोकेश राहुल, स्मृती मानधनासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना 'NADA'ची नोटीस

Big News : लोकेश राहुल, स्मृती मानधनासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना 'NADA'ची नोटीस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी ( बीसीसीआय) करारबद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह पाच क्रिकेटपटूंना राष्ट्रीय उत्तेजन प्रतिबंधीत संस्थेनं ( नाडा) नोटीस पाठवली आहे. या क्रिकेटपटूंना त्यांच्या राहाण्याची ठिकाणांची माहिती देण्यात विलंब झाला म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पासवर्डमध्ये गडबडीचं कारण बीसीसीआयनं दिली आहे. नोटीस मिळालेल्या क्रिकेटपटूंमध्ये महिला खेळाडू स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय नोंदणीकृत परीक्षण पूलमध्ये ( NRTP) सहभागी असलेल्या 110 क्रिकेटपटूंमध्ये या पाचही जणांचा समावेश आहे.

Breaking: पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीला झाला कोरोना

नाडाचे महानिर्देशक नवीन अग्रवाल यांनी सांगितले की,''या पाच खेळाडूंच्या ठिकाणांची माहिती देण्यास बीसीसीआय असमर्थ राहिल्यामुळे आम्ही ही नोटीस पाठवली आहे. Anti Doping Administration & Management Systems सॉफ्टवेअरमध्ये फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यानुसार खेळाडू स्वतः फॉर्म भरू शकतात किंवा त्यांची संघटना ते काम करू शकते. काही खेळाडू सुशिक्षित नसता किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते. त्यामुळे संघटनांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.''

क्रिकेटपटूंनाही हा फॉर्म भरताना अडचण येते, असे अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले,''क्रिकेटपटू शिक्षित असतात आणि ते स्वतः फॉर्म भरू शकतात. पण, त्यांच्याकडे कदाचित वेळ नसावा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ते फॉर्म भरू शकत नसतील, तर बीसीसीआयनं त्याच्या ठिकाणाची माहिती देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण, मागील तीन महिन्यांची माहिती बीसीसीआयनं का दिली नाही?''

अगडबम : लॉकडाऊनमुळे त्याला बनवलं शहरातील सर्वात 'वजन'दार व्यक्ती!

''बीसीसीआयनं या प्रश्नाचं दिलेलं उत्तर योग्य वाटतेय, परंतु निर्णय घेतला जाईल. त्यांनी सांगितले की पासवर्ड संबंधात गडबड झाली आहे आणि आता सांगत आहेत की समस्या सुटलेली आहे. बीसीसीआयच्या या उत्तरावर चर्चा होईल,'' असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. खेळाडूंना आपल्या ठिकाणाची माहिती देणे अनिवार्य आहे. असे तीन वेळा न केल्यास खेळाडूवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!

ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर झळकतायत कोहली, तेंडुलकर यांच्या नावाचे फलक; जाणून घ्या कारण 

जादू की भूत? आकाश चोप्रानं शेअर केला भयावह Video; तुम्हालाही बसेल धक्का 

आलिशान रिसॉर्टचा मालक आहे 'हा' क्रिकेटपटू; एका दिवसासाठी मोजावे लागतात 88 हजार !

अखेरचा गोल!, फुटबॉलपटूचे शव घेऊन सहकारी पोहोचले मैदानावर; Video पाहून आवरणार नाहीत अश्रू

 

Web Title: KL Rahul, Smriti Mandhana, Ravindra Jadeja among 5 players to get NADA notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.