Punjab Kings IPL 2021 Auction: पंजाबच्या संघानं नाव का बदललं? केएल राहुलनं केला खुलासा

Punjab Kings IPL 2021 Auction: किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) नावानं ओळखला जाणारा संघ आता पंजाब किंग्ज (Punjab Kings) या नावानं ओळखला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:18 PM2021-02-18T13:18:54+5:302021-02-18T13:21:37+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul reveals the reason behind the name change of punjab kings | Punjab Kings IPL 2021 Auction: पंजाबच्या संघानं नाव का बदललं? केएल राहुलनं केला खुलासा

Punjab Kings IPL 2021 Auction: पंजाबच्या संघानं नाव का बदललं? केएल राहुलनं केला खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Punjab Kings IPL 2021 Auction: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाबच्या संघानं आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) नावानं ओळखला जाणारा संघ आता पंजाब किंग्ज (Punjab Kings) या नावानं ओळखला जाणार आहे. पण १३ वर्षांनंतर पंजाबच्या संघानं आपल्या नावात बदल करण्यामागचं नेमकं कारण काय? हे समजू शकलं नव्हतं. आता संघाचा कर्णधार के.एल. राहुल (KL Rahul) यानं याचा खुलासा केला आहे. (KL Rahul reveals the reason behind the name change of punjab kings)

आज लागणार 292 क्रिकेटपटूंवर बोली; ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मोईन अली खाऊन जाणार भाव

पंजाब किंग्ज संघानं आपल्या नावात आणि लोगोमध्ये बदल केल्याची घोषणा ट्विटर हँडलवरुन केली आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल यांच्या पंजाब किंग्ज संघाला आजवर एकदाही विजेतेपद मिळवला आलेलं नाही. याआधी २००८ साली पंजाबच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. तर एकदा तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. यंदा संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल करण्यामागचं नेमकं कारण काय याबाबत केएल राहुल यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

धोनीच्या चाहत्यांची आशा मावळली, १२ वर्षांनंतर CSK च्या परंपरेला ब्रेक!

पंजाबच्या संघानं नाव आणि लोगो बदलण्यासोबत संघात काही महत्वाचे बदल देखील केले आहेत. पंजाबनं ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला करारमुक्त केलं आहे. तर संघाच्या प्रशिक्षण आणि व्यवस्थापनात कोणतेही बदल केलेले नाहीत. अनिल कुंबळेच यंदाही संघाच्या प्रशिक्षकपदी पाहायला मिळणार आहेत. तर केएल राहुलकडे संघाचं नेतृत्व असणार आहे. 

केएल राहुलनं सांगितलं नाव बदलण्यामागचं कारण
आयपीएलची लिलाव प्रक्रिया सुरू होण्याआधी कर्णधार केएल राहुल यानं संघाचं नाव बदलण्यामागचं कारण स्पष्ट केलं केलं आहे. "माझ्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब हे नाव देखील आवडतं होतं. पण हा संघ फक्त ११ खेळाडूंचा नाही. त्यापेक्षा एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि त्याच पद्धतीचं वातावरण संघात आहे. त्यामुळेच संघाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघाचं नवं नाव संघाचं नशीब पालटवणारं ठरेल अशी आशा आहे", असं केएल राहुल यानं सांगितलं. 

केएल राहुल यानं गेल्या मोसमात दमदार फलंदाजी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानं १४ सामन्यांमध्ये ५५.३८ च्या सरासरीनं ६७० धावा ठोकल्या आहेत. केएल राहुल याच्यासह संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यानंही संघाच्या नव्या नावाचं कौतुक केलं आहे. "संघाचं नवं नाव मला खूप आवडलं. बदल करत राहणं हे चांगलं आहे. केएल राहुलशी मी पूर्णपणे सहमत आहे. आमचा संघ हा फक्त ११ खेळाडूंचा नाही. सर्व खेळाडू आणि व्यवस्थापन, प्रशिक्षक या सगळ्यांचा मिळून संघ तयार होतो", असं ख्रिस गेल म्हणाला. 

Web Title: KL Rahul reveals the reason behind the name change of punjab kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.