KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे आणि तो लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:23 PM2024-03-20T15:23:33+5:302024-03-20T15:23:57+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul not joining the Lucknow Super Giants practice from the beginning today due to some flight related issues. he visited the Mahakaleshwar temple situated in Madhya Pradesh | KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल

KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : भारतीय संघाचा स्टार फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे आणि तो लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याआधी बुधवारी तो मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात आई-वडिलांसह दर्शनाला पोहोचला. तेथे त्याने भक्तीभावाने दर्शन घेतले. मात्र, एका तांत्रिक कारणामुळे त्याला अजूनही LSG ताफ्यात दाखल होता आलेले नाही.


बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करत असलेला राहुल दोन किंवा तीन दिवसांत त्याच्या LSG च्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होतं. पण, तो आज उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात पहाटे ६ वाजता कुटुंबियांसह दर्शनासाठी पोहोचला. जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर असलेल्या लोकेशचा आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



“तो मोसमाच्या पहिल्या सामन्यापासून खूप उपलब्ध असेल,” असे फ्रँचायझीच्या सूत्राने सांगितले होते. राहुल २० मार्च रोजी लखनौला रवाना होईल अशी अपेक्षा होती, परंतु २१ मार्च रोजी चेन्नईमध्ये प्री-आयपीएल कॅप्टन्स कॉन्क्लेव्हच्या पार्श्वभूमीवर, तो एक दिवस नंतर संघसहकाऱ्यांसोबत सामील होणार होता. पण, तो ज्या विमानाने लखनौ सुपर जायंट्सच्या कॅम्पसाठी रवाना होणार होता, त्यात काही तांत्रिक कारणामुळे विलंब झाला. LSGचा पहिला सामना २४ मार्च रोजी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.   

२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

Web Title: KL Rahul not joining the Lucknow Super Giants practice from the beginning today due to some flight related issues. he visited the Mahakaleshwar temple situated in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.