Join us

KL Rahul Flick Spcial Six, IPL 2022 LSG vs KKR Video: उमेश यादवच्या वेगवान चेंडूवर राहुलने लगावला भन्नाट षटकार

राहुल-डी कॉक जोडीने दिली शतकी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:50 IST

Open in App

KL Rahul Six Video: कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आजचा सामना जिंकणे कोलकातासाठी अनिवार्य आहे. तर दुसरीकडे लखनौ संघाला आजच्या विजयाने टॉप-२ मध्ये स्थान निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत लखनौच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत चांगली सुरूवात मिळवून दिली.

कर्णधार लोकेश राहुल आणि क्विंटन डी कॉक या जोडीने शतकी सलामी दिली आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. या सामन्यात लोकेश राहुलने मनगटाच्या बळावर मारलेला सिक्सर विशेष आकर्षण ठरला. कोलकाताकडून दमदार गोलंदाजी करणारा उमेश यादव गोलंदाजी करत होता. त्याने गुड लेंथ चेंडू राहुलच्या पायाजवळ टाकला. राहुलने त्याच्या वेगाचा फायदा घेत जागेवर उभे राहून भन्नाट षटकार लगावला. पाहा व्हिडीओ-

कोलकाता नाइट रायडर्स: व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, लोकेश राहुल, एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉयनीस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App