Join us

केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला

KL Rahul Breaks Virat Kohli And Rohit Sharma Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्माचा खास विक्रम मोडीत काढला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:57 IST

Open in App

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल याने ११ वे कसोटी शतक झळकावत अनेक मोठे विक्रम मोडले. राहुलने १९७ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी केली. या शतकामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त शतक करणारा फलंदाज ठरला आहे. शिवाय, त्याने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.

केएल राहुलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आता ६ शतके पूर्ण केली आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर ५ शतके आहेत. यासह राहुलने डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज:

फलंदाजशतक
रोहित शर्मा
शुभमन गिल
ऋषभ पंत
यशस्वी जयस्वाल
केएल राहुल
विराट कोहली
मयंक अग्रवाल
रवींद्र जडेजा

रोहित शर्माचाही विक्रम मोडला

केएल राहुलने सलामीवीर म्हणून कसोटी शतकांच्या बाबतीतही मोठी कामगिरी केली. या शतकासह सलामीवीर म्हणून राहुलचे हे १० वे कसोटी शतक आहे. तर, रोहित शर्माने सलामीवीर म्हणून ९ शतके झळकावली आहेत.

टीम इंडियासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक कसोटी शतके:

फलंदाज शतक
सुनील गावस्कर३३
वीरेंद्र सेहवाग२२
मुरली विजय१२
केएल राहुल१०
रोहित शर्मा
गौतम गंभीर

या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १६२ धावा करू शकला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत मिळून सात विकेट्स घेतल्या. या सामन्यात टीम इंडिया आता लक्षणीय आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul's Century Blitz: Surpasses Kohli, Rohit in Test Records

Web Summary : KL Rahul's 11th Test century against West Indies broke records. He now has more World Test Championship centuries than Virat Kohli. Rahul also surpassed Rohit Sharma as an opener with 10 Test centuries. India dominates the match after West Indies scored 162.
टॅग्स :लोकेश राहुलभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा