दुबई: आयपीएलच्या (IPL 2020) यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवण्यासाठी आज किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) संघ मैदानात उतरला आहे. पंजाबचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी (Royal Challenges Banglore) सुरू आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम राहुलनं केला आहे. त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. सचिन तेंडुलकरनं ६३ सामन्यांत आयपीएलमध्ये २ हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर राहुलला २ हजारांचा टप्पा पूर्ण करण्यास ६० सामने लागले. हीच कामगिरी करण्यास गौतम गंभीरला ६८, सुरेश रैनाला ६९, तर विरेंद्र सेहवागला ७० सामने लागले. आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा राहुल ३२ वा खेळाडू ठरला आहे. भारतीय फलंदाजांचा विचार केल्यास त्याचा क्रमांक २० वा लागतो.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- RCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा! विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं
RCB vs KXIP Latest News: राहुल, नाम तो सुनाही होगा! विराट, रोहितला जमलं नाही, ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं
RCB vs KXIP Latest News: राहुलची शानदार शतकी खेळी; तेंडुलकरचा विक्रम मोडला
By कुणाल गवाणकर | Updated: September 24, 2020 21:38 IST