Join us  

KL Rahul, IND vs WI T20 Series: मोठी बातमी: लोकेश राहुल, अक्षर पटेल यांची ट्वेंटी-२० मालिकेतून माघार; दोन युवा खेळाडूंचा टीम इंडियानं घेतला आधार

KL Rahul and Axar Patel ruled out of T20I Series : भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 6:28 PM

Open in App

KL Rahul and Axar Patel ruled out of T20I Series : भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. १६ फेब्रुवारीपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.  

लोकेश राहुलच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळेच त्याने तिसऱ्या वन डेतून माघार घेतली. अक्षर पटेलला मालिका सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि तो आता त्यातून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. आता ही दोघं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील. या दोघांच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋतुराज गायकवाड व दीपक हुडा यांची ट्वेंटी-२० संघात निवड केली आहे.  

भारताचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर,  मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा ( India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Surya Kumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Venkatesh Iyer, Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi, Yuzvendra Chahal, Washington Sundar, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Ruturaj Gaikwad, Deepak Hooda ) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजलोकेश राहुलअक्षर पटेल
Open in App