Join us

IPL 2021 Suspended : KKRच्या ताफ्यातील किवी फलंदाजाला कोरोना; मायदेशात रवाना होण्यापूर्वी आला रिपोर्ट अन्...  

IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:48 IST

Open in App

IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. KKRचा वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांच्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा लक्ष्मीपती बालाजी व मायकल हस्सी, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा अन् सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शनिवारी यात आणखी एका खेळाडूची भर पडली. WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी नाही

KKRच्या ताफ्यातील न्यूझीलंडचा फलंदाज टीम सेईफर्ट ( Tim Seifert) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मायदेशात रवाना होण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी केली गेली आणि त्यात यष्टिरक्षक-फलंदाजाला कोरोना असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंसह चार्टर्ड फ्लाईटनं मायदेशात जाता आले नाही. तो सध्या अहमदाबाद येथे विलगीकरणात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला तो KKRचा तिसरा खेळाडू आहे. बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी

न्यूझीलंड क्रिकेटनं सांगितले की,''मायदेशासाठी रवाना होण्यापूर्वी झालेल्या दोन्ही RT-PCR चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यात मध्यम लक्षणं आढळून आली आहेत. मागील १० दिवसांता झालेल्या कोरोना चाचणीत ७ वेळा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.'' सेईफर्टला पुढील उपचारासाठी चेन्नईला हलवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. चेन्नईतच CSKचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ''सेईफर्टवर उपचार केले जातील आणि त्यादरम्यान तो विलगीकरणात राहील. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो न्यूझीलंडसाठी रवाना होईल. तेथेही त्याला १४ दिवसांचा क्वांरटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल,''असे न्यूझीलंड क्रिकेटनं स्पष्ट केले. महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

दरम्यान, लंडनमध्ये कसोटी मालिकेसाठी जाणारे न्यूझीलंडचे तीन खेळाडूंनीही त्यांचा प्लान बदलला आहे. केन विलियम्सन, मिचेल सँटनर, कायले जेमिन्सन व फिजिओ टॉमी सिम्सेक हे नवी दिल्ली येथे मिनी बायो बबलमध्ये होते आणि तिथूनच ते लंडनसाठी रवाना होणार होते, परंतु आता ते मालदिवला गेले आहेत.   

मायकल हसीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ( Michael Hussey tests negative) चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज प्रशिक्षक मायकल हसी यांचा कोरोना रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आला, परंतु चेन्नईच्या हॉटेलमध्ये त्यांना क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे, अशी माहिती CEO कासी विश्वनाथन यांनी दिली.'' दिल्लीहून चेन्नईला येण्यापूर्वी हसीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्याची प्रकृती चांगली आहे. संघातील अन्य परदेशी खेळाडू मायदेशासाठी रवाना झाले आहेत, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग उद्या रवाना होतील,''असे विश्वनाथन यांनी सांगितले.  

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सन्यूझीलंड