KKR vs SRH Varun Chakravarthy Takes A Controversial Catch To Dismiss Abhishek Sharma : कोलकाता नाईट रायडर्सच्या घरच्या मैदानात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर सनरायझर्स हैदराबादच्या संघातील सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. धमाकेदार फलंदाजी पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रविस हेडनं ३४ चेंडूत ८२ धावांची भागीदारी रचली. पण या दोघांनाही अर्धशतक साजरे करता आले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SRH ची धडाकेबाज सुरुवात; अभिषेक शर्माच्या विकेटवरून वाद
ट्रॅविस हेड २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावांचे योगदान दिले. कार्तिक त्यागीनं त्याला कॅमरून ग्रीन करवी झेलबाद केले. त्यानंतर अभिषेक शर्माच्या रुपात ब्लेसिंग मुझारबानी याने एकाच षटकात ईशान किशन १४ (९) आणि अभिषेक शर्माला ४८ (२१) आपल्या जाळ्यात अडकवले. अवघ्या दोन धावांनी अर्धशतक हुकलेल्या अभिषेक शर्माच्या विकेटवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. वरुण चक्रवर्तीने घेतलेला त्याचा झेल वादग्रस्त ठरताना दिसत आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर हैदराबादच्या बॅटरनंही नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO)
नेमकं काय घडलं?
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आठव्या षटकातच धावफलकावर शंभर धावांचा टप्पा पार केला होता. नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्लेसिंग मुझारबानी याने ईशानची विकेट घेतली. याच षटकातील चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्मानं मोठा फटका खेळला. सीमारेषेवर वरुण चक्रवर्तीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. पण त्याने कॅच कॅरी करण्यापूर्वी चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याची चर्चा रंगली आहे. तिसरे पंच नितीन मेनन यांनी दिलेला निर्णयामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
याआधी SRH च्या क्लासेनच्या विकेटवरुन दिलेला निर्णय ठरला होता वादग्रस्त
याआधी आयपीएलच्या सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील हेन्री क्लासेन याच्या विरोधातील निर्णयही वादग्रस्त ठरला होता. फिल सॉल्टनं सीमारेषेवर घेतलेला झेलनंतर नितीन मेनन यांनीच क्लासेन आउट असल्याचा निर्णय दिला होता.
Web Summary : Abhishek Sharma's controversial dismissal during the KKR vs SRH match sparked debate. Varun Chakravarthy's catch was questioned, with replays suggesting the ball may have touched the ground. This follows a previous contentious decision against SRH's Klaasen, raising concerns about umpiring consistency.
Web Summary : केकेआर बनाम एसआरएच मैच में अभिषेक शर्मा के विवादास्पद विकेट ने विवाद खड़ा कर दिया। वरुण चक्रवर्ती के कैच पर सवाल उठे, जिसमें रिप्ले से पता चलता है कि गेंद जमीन को छू गई थी। इससे पहले क्लासेन के खिलाफ भी विवादास्पद निर्णय हुआ था।