Join us  

KKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव

KKR vs SRH Latest News : KKRनं अखेर IPL 2020तील पहिल्या विजयाची चव चाखली. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 11:00 PM

Open in App
ठळक मुद्देमनीष पांडेची अर्धशतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर अन् वृद्धीमान सहाच्या उपयुक्त धावापॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी, आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेटKKRकडून शुबमन गिलचे अर्धशतक, नितिश राणा व इयॉन मॉर्गनचीही फटकेबाजी

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडले. सामन्याच्या पहिल्या टप्प्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली. उपयुक्त गोलंदाजांचा सुरेख वापर अन् उत्तम क्षेत्ररक्षण लावताना कार्तिकनं SRHच्या धावांवर लगाम लावण्यात यश मिळवलं. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. शुबमन गिलनं अर्धशतकी खेळी करताना संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. KKR vs SRH Latest News & Live Score

IPL 2020तील आतापर्यं झालेल्या 7 सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण, आजचा सामना त्याला अपवाद ठरला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय SRHला महागात पडला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी SRHला सावध सुरुवात करून दिली. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या पॅट कमनिन्सनं ( Pat Cummins) चौथ्या षटकात KKRला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी बेअरस्टोला झेलबाद दिले, परंतु DRSमध्ये तो नाबाद असल्याचे समोर आले. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. KKR vs SRH Latest News & Live Score

वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. दिनेश कार्तिकच्या फिल्ड प्लेसमेंटनं आज सर्वांची वाहवाह मिळवली. पण, 10व्या षटकात वॉर्नरचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. वरुण चक्रवतीनं त्याच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद करून माघारी पाठवले. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मनीषनं 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आंद्रे रसेलनं ( Andre Russell) ही भागीदारी संपुष्टात आणली. 18व्या षटकात मनीष पांडे 38 चेंडूंत 51 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. सहा 30 धावांवर रन आऊट झाला. SRHला 20 षटकांत 4 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. KKR vs SRH Latest News & Live Score

लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात खलील अहमदनं KKRचा सलामीवीर सुनील नरीन ( Sunil Narine) याला बाद केले. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं ( Nitish Rana) SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 13 चेंडूंत 6 चौकारांसह 26 धावा केल्या. टी नटराजननं त्याला बाद केले. सातव्या षटकार कर्णधार वॉर्नरनं त्याचा हुकमी खेळाडू काढला. रशीद खाननं ( Rashid Khan) त्याच्या पहिल्याच षटकात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. पण, युवा फलंदाज शुबमन गिल एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 42 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह भक्कम भागीदारी करताना KKRचा यंदाच्या पर्वातील पहिला विजय पक्का केला. KKR vs SRH Latest News & Live Score

KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. 

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादशुभमन गिल