KKR vs SRH IPL 2026 Live Cricket Streaming : आयपीएल २०२६ च्या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात SRH संघाला गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून ६ विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हंगामातील दुसऱ्या सामन्यात KKR ला मुंबई इंडियन्सने पराभवाचा धक्का दिला होता. दोन्ही संघ पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असतील. इथं एक नजर टाकुयात कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड? कुठे पाहता येईल KKR विरुद्ध SRH यांच्यातील सामना? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR बालेकिल्ल्यात धमक दाखवणार का?
कोलकाताचे ईडन गार्डन्सचं ऐतिहासिक मैदान KKR साठी बाल्लेकिला मानले जाते. या मैदानात २००८ पासून ९५ सामन्यात त्यांनी ५४ विजय नोंदवले आहेत. तगडी फलंदाजी असलेल्या SRH ला रोखण्यासाठी सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. कर्णधार अजिंक्य रहाणे याने पहिल्याच सामन्यात धमक दावली. त्याच्यासह अंगक्रिष रघुवंशीनंही क्लास दाखवला होता. या दोघांसह फिन ॲलनही KKR ची फलंदाजीतील ताकद आहे.
IPL सुरू असतानाच स्टार फलंदाजाने घेतली तडकाफडकी निवृत्ती, सोशल मीडियावरून केली घोषणा
फलंदाजी तगडी, पण गोलंदाजीचा नाही भरवसा
SRH संघात अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि ट्रॅविस हेड यांसारखे दिग्गज फलंदाज आहेत. पण त्यांची गोलंदाजी कमकुवत दिसते. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत SRH चा संघ २००१ धावांचा बचाव करू शकला नव्हता. सलामीच्या सामन्यात गोलंदाजीत नितीश कुमार रेड्डी, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगा यांसारख्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड?
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ३० वेळा कोलकाता आणि हैदराबाद हे दोन फ्रँचायझी संघ समोरासमोर आले आहेत. यात KKR संघाने २० विजय नोंदवले असून SRH च्या संघाला फक्त १० सामनेच जिंकले आहेत.
कुठे आणि कधी रंगणार KKR vs SRH यांच्यातील सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येईल.
भारतामध्ये कुठे पाहता येईल सामना ?
- जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण
कोलकाता नाईट रायडर्स संघ
अजिंक्य रहाणे (कर्धणाधार), फिन ॲलन, कॅमरुन ग्रीन, अंगक्रिष रघुवंशी (यष्टीरक्षक फलंदाज), रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, मनीष पांडे, रोवमान तेब्बे, कार्तिकी दुबई, कर्णिब दुबई, कर्मन तिवारी. दहिया, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, टिम सेफर्ट, सार्थक रंजन, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, दक्ष कामरा.
सनरायझर्स हैदराबाद संघ
ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन ( कर्णधार/यष्टीरक्षक ), हेन्री क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, डेविड पायने, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, शिवांग कुमार, लियाम लिविंगस्टोन, स्मरण हुसेन, शिवांग कुमार, स्मरण रवींद्रन अन्सारी, कामिंदू मेंडिस, ब्रायडन कार्स, प्रफुल हिंगे, क्रेन फुलेत्रा, ओंकार तरमळे, अमित कुमार