Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ajinkya Rahane IPL Record : अजिंक्य रहाणेचा पराक्रम; ईडन गार्डन्सच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

IPL मध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:16 IST

Open in App

Ajinkya Rahane IPL Record : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात IPL मध्ये खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील सहावा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मैदानात उतरताच अजिंक्य रहाणेनं खास 'द्विशतक' साजरे केले. आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा अजिंक्य रहाणे हा ११ वा खेळाडू ठरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

MS धोनीच्या नावे आहे IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत धोनीनं २७८ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ या यादीत रोहित शर्मा (२७३ सामने) आणि विराट कोहली (२६९) यांचा नंबर लागतो.

"जे घडलं ते..." LSG संघ मालक संजीव गोएंका यांचे कर्णधार रिषभ पंतसह संघासंदर्भात मोठं वक्तव्य

वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून रहाणेनं साधला २०० सामने खेळण्याचा डाव

रहाणेने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५०९९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३०.७२ आणि स्ट्राइक रेट १२५.४४ आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करण्याआधी रहाणे चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रायझिक पुणे सुपरजाएंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रँचायझी संघाकडूनही खेळला आहे. कोलकाताच्या संघाविरुद्ध त्याने २०० IPL सामने खेळण्याचा टप्पा गाठला.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेनं आयपीएलमध्ये सर्वोच्च कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. गत हंगामापासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करत आहे. २०० व्या सामन्यासह खास विक्रमी डाव साधल्यावर संघाला सामना जिंकून देत रहाणे हा क्षण आणखी खास करणार का? ते पाहण्याजोगे असेल.

IPL मध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी 

  • महेंद्रसिंग धोनी- २७८
  • रोहित शर्मा -२७३
  • विराट कोहली - २६९
  • दिनेश कार्तिक - २५७
  • रवींद्र जडेजा -२५५
  • शिखर धवन - २२२
  • रविचंद्रन अश्विन - २२१
  • सुरेश रैना - २०५
  • रॉबिन उथप्पा - २०५
  • अंबाती रायडू - २०४
  • अजिंक्य रहाणे – २००
English
हिंदी सारांश
Web Title : Ajinkya Rahane Achieves Milestone: 200 IPL Matches Played

Web Summary : Ajinkya Rahane marked his 200th IPL appearance, becoming the 11th player to reach this milestone. He has played for various franchises, amassing 5099 runs. MS Dhoni holds the record with 278 matches.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग