Shah Rukh Khan Performance At IPL 2025 Opening Ceremony : गत चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्सच्या घरच्या मैदानातून यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. षटकार चौकारांची बरसात होण्याआधी पावसामुळे सामना होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असताना कोलकाता नाईट रायडर्संचा संघ मालक मोठ्या विश्वासानं कोलकाता येथे पोहचला आहे. केकेआर संघ मैदानात उतरणार म्हटल्यावर शाहरुख दिसणार नाही असे होत नाही. पण सलामीच्या लढतीआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यातही तो थिरकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शाहरुख खान याने खुद्द सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्टेजवर दिसणार शाहरुख खानचा जलवा
आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीच्या लढतीआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसह श्रेया घोषाल मैफिल लुटणार असल्याची बातमी आधीच जगजाहीर झालीये. त्यात आता शाहरुख खानची भर पडणार आहे. शाहरुख खान याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केलीये. ज्यात त्याने 'पठाण' या चित्रपटातील डायलॉगस एक खास फोटो शेअर केलाय. यात त्याने लिहिलंय की, "पार्टी पठान के घर पे रखोगे तो मेहमान नवाजी करने के लिये पठान खुद आएगा और पटाखे भी लाएगा!"
मॅच आधी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे IPL उद्घाटन सोहळा
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढती आधी सायंकाळी ६ वाजता ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम नियोजित आहे. यावेळी स्टेजवर जलवा दाखवण्यासाठी तयार असल्याची माहितीच शाहरुख खानने आपल्या पोस्टमधून दिली आहे. एका बाजूला कोलकाता येथील सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट असताना दुसऱ्या बाजूला शाहरुखलाही उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासह सामना खेळवला जाईल, असा विश्वास असल्याचे दिसून येते.