ईडन गार्डन्सवर गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांचा सामना रंगला होता. या थरारक सामन्यात मुकुल चौधरी नावाचा एक नवा तारा समोर आला. एक वेळ लखनौने १६ षटकांत १२८ धावांवर ७ फलंदाज गमावले होते, मात्र यानंतर मुकुलने २७ चेंडूत नाबाद ५४ धावांचा जबरदस्तखेळी खेळत संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला. त्याच्या या वादळी खेळीमागे गुरुमंत्र होता त कर्णधार ऋषभ पंतचा. त्याचा हा सल्ला 'गेम चेंजर' ठरला.
मुकुल म्हणाला, "मी पूर्वी घाई करायचो, मात्र आता मी प्रोसेसवर लक्ष केंद्रित करतो. गेल्या डावात मी केवळ ४-५ चेंडूच खेळू शकलो, म्हणून मी पंत भैय्यांशी बोललो. तो म्हणाला, 'जास्त विचार करू नकोस, फक्त चेंडू बघ आणि मार. जास्त विचार केलास, तर दडपण वाढेल.' हा सल्ला मुकुलच्या या खास खेळीसाठी गुरुमंत्र ठरला.संघाला असा मिळवून दिला विजय - कोलकात्याच्या संघाने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या २ षटकात लखनौसुपर जाएंट्सच्या संघाला ३ विकेट्स हातात असताना ४० धावांची गरज होती. १९ व्या षटकात त्याने कॅमरुन ग्रीनच्या षटकात दोन षटकारांसह एका चौकाराच्या मदतीने १६ धावा कुटल्या. वैभव सूर्यवंशी घेऊन आलेल्या अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर आवेश खान याने त्याला एकेरी धाव काढत स्ट्राईक दिले. या षटकात दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत मुकुल चौधरी याने संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. या षटकारानंतर दमदार कमबॅक करत वैभव अरोरानं दोन निर्धाव चेंडू टाकले. पण दबावात पाचव्या चेंडूवर षटकार मारत त्याने कोलकाताच्या बाजूने झुकलेला सामना लखनौच्या बाजूनं वळवला. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी साकारली.कोण आहे मुकुल चौधरी? कसा सुरू झाला प्रवास? मुकुल चौधरीचे वडील दिलीप कुमार चौधरी यांची त्याच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात शिक्षकाच्या रुपात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी रिअल इस्टेट व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात स्थिर झाल्यावर मुकुलला क्रिकेटचं उत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी सिकर येथील SBS क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. त्यानंतर मुकुलने जयपूरमधील अरावली क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले.
धोनीचा प्रभाव अन् विकेट किपर बॅट्समन बनला - मुकुल चौधरी याने मध्यम जलदगती गोलंदाजाच्या रुपात आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. एका सामन्यात संघाच्या गरजेनुसार त्याने विकेट किपिंग केली आणि हीच भूमिका स्वीकारली. MS धोनीकडून प्रेरणा घेत त्याने बिग हिटरच्या रुपात आपली खास छाप सोडली. गत वर्षी २३ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्याने १०३ च्या सरासरीसह १४२ च्या स्ट्राईक रेटनं ६६७ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेत सलग शतकांसह त्याने सर्वाधिक ३४ षटकार ठोकले होते. याच स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची राजस्थानच्या संघात निवड झाली. २०२५-२६ च्या हंगामात त्याने ५ सामन्यांत १९९ च्या स्ट्राईक रेटनं १७३ धावा करत फिनिशरच्या रुपात सर्वोत्तम खेळाडू असल्याची झलक दाखवली होती. त्याच्या याच खेळींच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सने त्याला IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये 2.60 कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले.
Web Summary : Mukul Choudhary's explosive 54* off 27 balls guided LSG to a thrilling victory against KKR. Rishabh Pant's advice to 'just hit the ball' proved to be a game-changer, helping Choudhary overcome pressure and deliver crucial blows in the final overs. His father played a key role, ensuring quality cricket training.
Web Summary : मुकुल चौधरी के 27 गेंदों में नाबाद 54 रनों की तूफानी पारी ने केकेआर के खिलाफ एलएसजी को रोमांचक जीत दिलाई। ऋषभ पंत की 'बस गेंद मारो' की सलाह गेम-चेंजर साबित हुई, जिससे चौधरी को दबाव से उबरने और अंतिम ओवरों में महत्वपूर्ण प्रहार करने में मदद मिली। उनके पिता ने अहम भूमिका निभाई।