KKR vs KXIP Latest News : कोलकातानं पुन्हा अनपेक्षित निकाल नोंदवला, पंजाबचा दोन 'इंचां'नी पराभव

 अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना KKR नं अवघ्या दोन धावांनी जिंकला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 07:29 PM2020-10-10T19:29:41+5:302020-10-10T19:37:47+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs KXIP Latest News: Kolkata Knight Riders again recorded an unexpected result, won by 2 runs | KKR vs KXIP Latest News : कोलकातानं पुन्हा अनपेक्षित निकाल नोंदवला, पंजाबचा दोन 'इंचां'नी पराभव

KKR vs KXIP Latest News : कोलकातानं पुन्हा अनपेक्षित निकाल नोंदवला, पंजाबचा दोन 'इंचां'नी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जलद अर्धशतकानं रंगत वाढवली. चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) अऩपेक्षित विजय नोंदवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आजही अनपेक्षितच विजय मिळवला. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी 115 धावांची भागीदारी करताना KKRला पराभवाच्या छायेत टाकले होते. पण, दिनेश कार्तिकनं पुन्हा त्याच्या गोलंदाजांचा कल्पकतेनं वापर करून घेतला अन् दोन धावांनी सामना जिंकला.  KKR vs KXIP Latest and Live News 

KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. मॉर्गन आणि गिल यांनी KKRचा डाव सावरला. त्यांची 49 धावांची भागीदारी रवी बिश्नोईनं संपुष्टात आणली. मॉर्गन 24 धावांत माघारी परतला. गिल एका बाजूनं KKRचा डाव सांभाळून होता आणि कार्तिकनं त्याला साथ दिली. गिल-कार्तिकची 82 धावांची भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली. गिल 57 धावांवर धावबाद झाला. कार्तिकनं 29 चेंडूंत 58 धावा केल्या. कोलकाताला 6 बाद 164 धावांवर समाधान मानावे लागले. 

प्रत्युत्तरात उतरलेल्या KXIP ला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असला, परंतु घडलं वेगळंच. KXIPला रोखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या KKRला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) हातून लोकेश राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्यानं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं. एक जीवदान मिळाल्यानंतर राहुलनं संयमी खेळ केला. राहुल-मयांक अग्रवाल या जोडीनं KKRच्या गोलंदाजांना यश मिळवूच दिले नाही. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

15 व्या षटकात KKRला पहिले यश मिळाले. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल झेलबाद झाला. मयांकनं 39 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 56 धावा केल्या. मयांक-राहुलनं पहिल्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या. त्यांच्या या खेळीनं KXIPचा विजय पक्काच केला होता, पण अखेरच्या षटकांत KXIPला धक्के बसल्यानं सामन्याची चुरस कायम राहिली. प्रसिध कृष्णानं 19व्या षटकात KXIPला दोन धक्के दिले. त्यात 74 धावा करणाऱ्या लोकेश राहुलचाही समावेश होता. त्यामुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत ताणला आणि KKRनं पुन्हा अशक्यप्राय विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी सात धावा हव्या असताना ग्लेन मॅक्सवेलनं खणखणीत फटका मारला पण सीमारेषेपासून अवघ्या दोन इंचाच्या अंतरावर तो टप्पा घेत चौकार गेला अऩ् दोन इंचांनी सामना KKRनं जिंकला. 

Web Title: KKR vs KXIP Latest News: Kolkata Knight Riders again recorded an unexpected result, won by 2 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.