KKR vs KXIP Latest News : इयॉन मॉर्गनला झेल टिपणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचं सेलिब्रेशन व्हायरल, Video 

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना सुरू आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 04:45 PM2020-10-10T16:45:36+5:302020-10-10T16:45:58+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs KXIP Latest News : Kings XI Punjab fans how's this for a celebration from Glenn Maxwell? watch video  | KKR vs KXIP Latest News : इयॉन मॉर्गनला झेल टिपणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचं सेलिब्रेशन व्हायरल, Video 

KKR vs KXIP Latest News : इयॉन मॉर्गनला झेल टिपणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचं सेलिब्रेशन व्हायरल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना सुरू आहे. KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) अनपेक्षित विजयानंतर KKR आत्मविश्वासानं खेळतील असे वाटले होते. पण, KXIPच्या गोलंदाजांनी त्यांच्या धावांवर लगाम लावला. KKR vs KXIP Latest and Live News

कोलकाताच्या फलंदाजांचा सावळा गोंधळ; दोघंही एकाच एंडला अऩ... Video

CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलनं शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणानं क्रिज सोडलं. पण, गिलचं त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. झटपट दोन फलंदाज माघारी गेल्यामुळे KKRने इयॉन मॉर्गनला पुढे पाठवले. मॉर्गन आणि गिल यांनी KKRचा डाव सावरला. KKR vs KXIP Latest and Live News

त्यांची 49 धावांची भागीदारी रवी बिश्नोईनं संपुष्टात आणली. 11 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बिश्नोईच्या गोलंदाजीवर मॉर्गननं जोरदार फटका मारला आणि ग्लेन मॅक्सवेलनं तो सहज टिपला. मॉर्गन 24 धावांत माघारी परतला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं भारी सेलिब्रेशन केलं. KKR vs KXIP Latest and Live News

पाहा व्हिडीओ...


    
Kolkata Knight Riders XI: राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, नितिश राणा, सुनील नरीन, इयॉन मॉर्गन, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, पी कृष्णा, वरुण चक्रवर्थी 

Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, सिम्रन सिंग, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग   

Web Title: KKR vs KXIP Latest News : Kings XI Punjab fans how's this for a celebration from Glenn Maxwell? watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.