Join us  

IPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय

ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 3:52 PM

Open in App
ठळक मुद्देगेलने यावेळी 38 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 62 धावांची तुफानी फलंदाजी केली. राहुलनेही जबरदस्त फटकेबाजी करत 7 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 60 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय

कोलकाता : ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. गेलने यावेळी 38 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 62 धावांची तुफानी फलंदाजी केली. राहुलनेही जबरदस्त फटकेबाजी करत 7 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 60 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. कोलकात्याने ख्रिस लिनच्या 74 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबपुढे 192 धावांचे ठेवले होते. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा पंजाबने 8.2 षटकांत बिनबाद 96 अशी मजल मारली होती. त्यानंतर पंजाबला डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजयासाठी 13 षटकांत 125 धावांचे आव्हान दिले होते. राहुल आणि गेल यांनी दणकेबाज फटकेबाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

8.30 PM : गेलच्या षटकाराने पंजाबचा कोलकात्यावर विजय

8.28 PM : पंजाबला विजयासाठी 12 चेंडूंत 5 धावांची गरज

8.15 PM : एक षटकार आणि दोन चौकारांच्या फटकेबाजीनंतर राहुल बाद

- लोकेश राहुलने दमदार फटकेबाजी करत 27 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 60 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

8.12 PM : लोकेश राहुलचे षटकार लगावत अर्धशतक

8.10 PM : - गेलचे दणकेबाज षटकारासह धडाकेबाज अर्धशतत

- पावसानंतर टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर गेलने षटकार लगावत झोकात आपले अर्धशतक साजरे केले.

8.08 PM : पंजाबला विजयासाठी 28 चेंडूंत 29 धावांची गरज

6.41 PM : पावसामुळे खेळ थांबला, पंजाब 8.2 षटकांत बिनबाद 96

6.28 PM : गेलने हिरावली कोहलीकडून ऑरेंज कॅप

6.18 PM : गेलचा झंझावात सुरु; पंजाबचे चौथ्याच षटकात अर्धशतक

6.08 PM : गेलने चौकारांसह केला धावांचा श्रीगणेशा

- रसेलच्या दुसऱ्या षटकात गेलने चौकारासह आपल्या धावांचे खाते उघडले.

6.05 PM : राहुल तळपला; दुसऱ्या षटकातही फटकावले सलग दोन चौकार

- आंद्रे रसेलच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवरही राहुलने चौकार वसूल केले.

6.01 PM : लोकेश राहुलने केली चौकाराने डावाची सुरुवात

- लोकेश राहुलने शिवम मावीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरही राहुलने चैकार लगावला.

ख्रिस लिनचा तडाखा; कोलकात्याचे 191 धावांवर समाधान

कोलकाता : कोलकाताच्या ख्रिसच्या फलंदाजीपुढे पंजाबचे गोलंदाज 'लीन ' झालेले पाहायला मिळाले. लिन फटकेबाजी करत असताना कोलकात्याचा संघ सहजपणे दोनशे धावांचा उंबरठा ओलांडेल असे वाटत होते. पण लिन बाद झाला आणि कोलकात्याला 191 धावांवर समाधान मानावे लागले. लिनने आपल्या या खेळीत 41 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 74 धावा फटकावल्या. लिनला 62 धावांवर असताना बरिंदर सरणने जीवदान दिले होते, पण या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही.

5.45 PM : कोलकाताचे पंजाबपुढे 192 धावांचे आव्हान

5.37 PM : दिनेश कार्तिक बाद; कोलकात्याला सहावा धक्का

5.22 PM : कोलकाताला पाचवा धक्का; आंद्रे रसेल OUT

5.14 PM : कोलकाताला मोठा धक्का; अर्धशतकवीर लिन OUT

- दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या लिनला यावेळी अॅण्ड्र्यू टायने बाद केले. लिनने 41 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 74 धावा फटकावल्या.

5.11 PM : कोलकाता 15 षटकांत 3 बाद 146

5.01 PM : ख्रिस लिनला 62 धावांवर जीवदान

- तेराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बरिंदर सरणने लिनचा झेल सोडला, त्यावेळी लिन 62 धावांवर होता.

4.56 PM : ख्रिस लिनने झळकावले अर्धशतक

- आतापर्यंत टीकेचा धनी ठरत असलेल्या लिनने या सामन्यात आपल्या टीकाकारांन अर्धशतक झळकावत चोख उत्तर दिले.

4.54 PM : बाराव्या षटकात कोलकात्याचे शतक पूर्ण

4.49 PM : कोलकाता दहा षटकांत 3 बाद 86

4.45 PM : कोलकाताला तिसरा धक्का; नितीश राणा धावबाद

फॉर्मात असलेल्या कोलकात्याचा नितीश राणाने यावेळी धावबाद होत आत्मघात केला. राणाला फक्त तीन धावांवर समाधान मानावे लागले.

4.40 PM : कोलकाताला दुसरा धक्का; उथप्पा OUT

- दमदार फटकेबाजी करत असलेल्या उथप्पाला पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बाद केले. उथप्पाने 23 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 34 धावा केल्या.

4.37 PM : आठव्या षटकात कोलकाताने लूटल्या 23 धावा

- बरिंदन सरणच्या आठव्या षटकात लिन आणि उथप्पा यांनी तीन षटकार आणि एका चौकारासह तब्बल 23 धावा फटकावल्या.

4.30 PM : सहाव्या षटकात कोलकाताचे अर्धशतक पूर्ण

4.21 PM : कोलकाता पाच षटकांत 1 बाद 42

- नरिन बाद झाल्यावरही ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी संघाचा डाव सावरला, त्यामुळेच कोलकात्याला पाच षटकांमध्ये 42 धावांपर्यंत मजल मारता आली.

4.08 PM : कोलकाताला पहिला धक्का; सुनील नरिन OUT

- कोलकाताचा धडाकेबाज सलामीवीर सुनील नरिनला मुजीब उर रेहमानने स्वस्तात बाद केले.

3. 45 PM : ख्रिस गेल अॉरेंज कॅप पटकावणार का?

3.35 PM : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

 

कोलकाता आणि पंजाबमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस

कोलकाता : आतापर्यंत दमदार कामिगरी करत कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांनी प्रत्येकी सहा गुण पटकावले आहेत. त्यामुळे या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. या सामन्यात साऱ्यांच्या नजरा असतील त्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर. कारण पंजाबचा ख्रिस गेल हा भन्नाट फॉर्मात आहे. दुसरीकडे कोलकाताच्या संघात सुनील नरिन आणि आंद्रे रसे हे दोन्ही वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. हे तिन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे यापैकी कोणता खेळाडू दमदार कामगिरी करून संघाला अव्वल स्थानावर पोहोचवतो, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

 

दोन्ही संघ

 

 

 

 

दोन्ही संघांचे ईडन गार्डन्सवर आगमन

 

टॅग्स :आयपीएल 2018किंग्ज इलेव्हन पंजाबकोलकाता नाईट रायडर्स