Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता टीम इंडियातील 'या' स्टार क्रिकेटरमुळे शाहरुखच्या KKR चं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?

कोट्यवधीची स्वस्तात मस्त डीलही कोलमडली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:23 IST

Open in App

IPL 2026 स्पर्धेतील १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी शाहरुख खानच्या सह-मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला आणखी एक धक्का बसला आहे. बॉलिंग ऑलराउंडर हर्षित राणा याच्यानंतर आता आकाश दीपही यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे कर्णधार अंजिक्य रहाणेसह फ्रँचायझी संघाचे टेन्शन वाढले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोट्यवधीची स्वस्तात मस्त डीलही कोलमडली 

२९ वर्षीय जलदगती गोलंदासाठी  कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मिनी लिलावात १ कोटी रुपये मोजले होते.  बेस प्राइजसह KKR साठी तो फायद्याचा सौदा ठरेल, असे वाटत असताना हा गोलंदाज IPL च्या यंदाच्या  हंगामाला मुकणार असल्याची बातमी समोर आली. क्रिकबझच्या वृत्तानुसार फ्रँचायझी संघाच्या अधिकाऱ्याने आकाश दीपने स्पर्धेतून माघार घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. तो सध्या बंगळुरु स्थित सेंटर ऑफ एक्सीलेन्स (COE) मध्ये पुनरवसन प्रक्रियेतून जात आहे. त्याला नेमकी कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे ते अजूनही गुलदस्त्यातच आहे.

"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?

KKR ला हर्षित राणाच्या रुपात बसला पहिला धक्का

शाहरुखच्या सह मालकीच्या KKR संघाला हर्षित राणाच्या रुपात पहिला धक्का बसला होता. टी-२० वर्ल्ड कप  स्पर्धेनंतर भारताचा स्टार ऑलराउंडर IPL च्या यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. त्यात आता आकाश दीपच्या नावाची भर पडली आहे. 

धक्क्यावर धक्का अन् एक दिलासा

श्रीलंकेचा जलगदती गोलंदाज मथीशा पथिराणा हा देखील यंदाच्या हंगामात केकेआरच्या संघाकडून खेळणार आहे. दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतील सहभागाबाबतही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. पण तो फिट होऊन संघात परतेल, असा विश्वास फ्रँचायझी संघाने व्यक्त केला आहे. १८ कोटींचा गडी परतण्याचे संकेत गा KKR साठी  मोठा दिलासा मानला जात आहे.

रहमानच्या जागी मुझरबानी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारत-बांगलादेश यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे बीसीसीआयने KKR ला बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानला रिलीज करण्याच आदेश दिले. त्याच्या जागी संघाने १३ मार्चला झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानी याला आपल्या संघात घेतलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : KKR's Worries Mount: Star Cricketers Out, Uncertainty Looms for IPL 2026

Web Summary : KKR faces setbacks as Akash Deep joins Harshit Rana in missing IPL 2026 due to injury. Despite this, the expected return of Matheesha Pathirana offers a glimmer of hope. Blessing Muzarabani replaces Mustafizur Rahman in the squad.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सआकाश दीपआयपीएल २०२४हर्षित राणाइंडियन प्रीमिअर लीगअजिंक्य रहाणे