ठळक मुद्देकोलकाता नाईट रायडर्सकडून गौतम गंभीरचे आभारKKR ला जिंकून दिली दोन जेतेपदभविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
कोलकाता : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांत गौतम गंभीरचे नाव नसावे तर नवल. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) संघाने दोन जेतेपद पटकावली. मात्र गत हंगामात KKRने त्याला मुक्त केले आणि गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने आधार दिला. मात्र आपल्याकडून चांगला खेळ होत नाही हे लक्षात येताच गंभीरने स्वतःहून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधारपदाचीआळ श्रेयस अय्यरकडे सोपवली. गंभीरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर KKR ने गंभीरचे आभार मानले. सातवर्ष तो या संघासोबत होता.
KKR कडून गंभीरसह सलामीची धुरा सांभाळणाऱ्या रॉबीन उथ्थपाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून गंभीरचे आभार मानले. त्याने लिहिले की," मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही.. विशेषतः गंभीरसारख्या सच्चा क्रिकेटपटूने ती घ्यावी असे कधीच वाटत नाही. त्याचे खूप खूप अभिनंदन.. त्याने क्रिकेटला भरभरून दिले. त्याच्यासोबत मला खेळण्याची संधी मिळाली हे भाग्य. त्याच्या दुसऱ्या इनिंग्ससाठी शुभेच्छा."
KKR संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसोर यांनीही ट्विट केले."गौतम गंभीरचे अभिनंदन. तुझी एक इनिंग संपुष्टात आली असली तरी दुसऱ्या इनिंगमध्ये तुला असेच यश मिळो ही शुभेच्छा," असे मैसोर यांनी पोस्ट केली.