KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण

आधीच दोन पराभव, त्यात या गोष्टीमुळे KKR चं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 20:09 IST2026-04-06T20:07:21+5:302026-04-06T20:09:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
KKR Captain Ajinkya Rahane On Why Varun Chakaravarthy And Sunil Narine Not Playing In The Match Against PBKS IPL 2026 | KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण

KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण

IPL 2026 KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दुहेरी धक्का बसला. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात केकेआरचा संघ सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोन स्टार गोलंदाजांशिवाय मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार अजिंक्य रहाणेनं एकाच वेळी कोलकाताच्या ताफ्यातील दोन्ही स्पिनर प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब' होण्यामागचं कारणही सांगितले आहे.  

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मिस्ट्री स्पिनर्संना प्लेइंग इलेव्हनमध्ये का मिळालं नाही स्थान?  

अजिंक्य रहाणे याने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाइलाजास्तव सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्याशिवाय मैदानात उतरण्याची वेळ आली, असे अजिंक्य रहाणेने सांगितले. कॅरेबियन ऑलराउंडर आजारी असल्यामुळे तो पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. याशिवाय वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे सामन्याला मुकल्याचे कर्णधाराने स्पष्ट केले. ही गोष्ट आधीच अडचणीत असलेल्या KKR च्या संघाचं टेन्शन वाढवणारी आहे. 

IPL Unique Record : किंग कोहलीनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

KKR चं टेन्शन वाढलं

सुनील नरेन हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. १९० सामन्यात त्याने १९३ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीशिवाय तुफान फटकेबाजीसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यात त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. हीच गोष्ट वरुण चक्रवर्तीच्याही बाबतीत घडली. टी-२० मधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला वरुण चक्रवर्ती मागील काही सामन्यात आपल्या फिरकीची जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आता त्याच्या दुखापतीमुळे  KKR संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

सलग दोन पराभव

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने घरच्या मैदानात कोलकाता संघाला पराभवाचा दणका दिला. आता दोन मॅचविनर खेळाडूंशिवाय दमदार कमबॅक करण्याचे मोठं चॅलेंज कोलकाता संघासमोर आहे.

Web Title : केकेआर के मिस्ट्री स्पिनर गायब; रहाणे ने बताई वजह।

Web Summary : सुनील नरेन की बीमारी और वरुण चक्रवर्ती की चोट के कारण केकेआर को झटका लगा, जिससे उन्हें पंजाब किंग्स के खिलाफ मैच से बाहर होना पड़ा। कप्तान रहाणे ने इन कारणों का हवाला दिया, जिससे लगातार दो हार के बाद केकेआर पर दबाव बढ़ गया। उनकी अनुपस्थिति केकेआर के गेंदबाजी आक्रमण को कमजोर करती है।

Web Title : KKR's mystery spinners absent; Rahane reveals the reason behind their absence.

Web Summary : KKR faced a setback as Sunil Narine was ill and Varun Chakravarthy injured, forcing them to miss the match against Punjab Kings. Captain Rahane cited these reasons, adding pressure to KKR after two consecutive losses. Their absence weakens KKR's bowling attack significantly.