अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपल्या घरच्या मैदानात यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या विक्रमी २२७ धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १६ षटकांतच १६१ धावांवर आटोपला. या सामन्यात धावबादच्या रुपात गमावलेल्या दोन विकेट्सची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. ज्या खेळाडूवर २५ कोटींचा डाव लावला त्याने KKR ला पुन्हा चुना लावला. त्यात रिंकू आणि अंगकृष रघुवंशीं यांच्या घाईनं संघाच्या अडचणीत आणखी भर घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२५ कोटींच्या खेळाडूनं पुन्हा लावला चुना
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना फिन ॲलन याने पहिल्याच षटकात आक्रमक फटकेबाजी करत २४ धावा कुटल्या. पण दुसऱ्या षटकात धावफलकावर ३० धावा असताना तो तंबूत परतला. करणधार अजिंक्य रहाणे याने ८ धावा करून मैदान सोडल्यावर मागच्या सामन्यातील युवा अर्धशतकवीर अंगकृष रघुवंशी आणि २५.२० कोटी मोजलेल्या कॅमरून ग्रीनवर मोठी जबाबदारी होती. पण २१ वर्षीय युवा बॅटर आणि ऑस्ट्रिलियन कॅमरून ग्रीन यांच्यात ताळमेळाचा अभाव दिसला. सलग दुसऱ्या सामन्यात मोठा पगार घेऊन अर्धवट काम करणाऱ्या खेळाडूनं केकेआरला चुना लावला. २ चेंडूक २ घावा करून तो धावबाद झाला. सोशल मीडियावर त्याने विकेट फेकल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. आधीच हा ऑलराउंडर मोठी रक्कम घेऊन बॉलिंग का करत नाही? अशी चर्चा रंगत असताना बॅटिंगमध्येही तो फ्लॉप ठरताना दिसतोय.
IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय
रिंकू-रघुवंशी यांच्यात ताळमेळाचा अभाव महागात पडला
मुंबईकर युवा अनकॅप्ड बॅटर अंगकृष रघुवंशी याने संघ अडचणीत असताना यंदाच्या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने संघाच्या विजयाची आस निर्माण केली, पण रिंकू सिंह आणि त्याच्यातील ताळमेळाचा अभाव दिसला. रिंकून मारलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला असताना त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला अन् २९ चेंडूत ५१ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. धावबादच्या रुपात गमावलेल्या या २ विकेट्ची किंमत कोलकाता नाईट रायडर्सला पराभवासह चुकवावी लागली.
Web Summary : KKR faced another home defeat after failing to chase SRH's 227. Costly run-outs, including Cameron Green's dismissal after a miscommunication and Rinku-Raghuvanshi's error, hampered their chase. Green's performance drew criticism, adding to KKR's woes.
Web Summary : एसआरएच के 227 रनों का पीछा करने में विफल रहने के बाद केकेआर को एक और घरेलू हार का सामना करना पड़ा। कैमरून ग्रीन की गलतफहमी और रिंकू-रघुवंशी की गलती सहित महंगे रन-आउट ने उनके पीछा को बाधित किया। ग्रीन के प्रदर्शन की आलोचना हुई, जिससे केकेआर की मुश्किलें बढ़ गईं।