Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत- न्यूझीलंड सामन्याआधी किवी गोलंदाजाचा कहर, ५ चेंडूत टिपल्या ५ विकेट्स!

क्रिकेटच्या शतकानुशतके जुन्या इतिहासात आजवर जे घडले नाही, ते न्यूझीलंडच्या घरगुती स्पर्धेत पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:07 IST

Open in App

क्रिकेटच्या शतकानुशतके जुन्या इतिहासात आजवर जे घडले नाही, ते न्यूझीलंडच्या घरगुती स्पर्धेत पाहायला मिळाले. नेपियरमधील मॅकलीन पार्क येथे सुरू असलेल्या प्लंकेट शील्ड स्पर्धेत सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सचा वेगवान गोलंदाज c याने सलग ५ चेंडूत ५ विकेट्स घेण्याचा अद्भूत पराक्रम केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा रँडेल हा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स यांच्यातील सामन्यात रँडेलने आपल्या गोलंदाजीने अक्षरशः विरुद्ध संघाचे कंबरडे मोडले. रँडेलने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हेन्री कूपरला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूत अनुभवी जीत रावलला आउट केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जो कार्टर, तिसऱ्या चेंडूत रॉबर्ट ओ'डोनेल आणि चौथ्या चेंडूवर ख्रिश्चन क्लार्कला बोल्ड केले.

रँडेल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या पुढील षटकात बेन पोमारे आणि स्कॉट कुगेलेइजन यांनाही आउट केले. रँडेलने अवघ्या ११ षटकांत २५ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर ब्रेट रँडलने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, "हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटतेय. मी फक्त योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो." 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ५ चेंडूत ५ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप एकाही गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर (कसोटी, वनडे किंवा टी२०) असा पराक्रम करता आलेला नाही. दरम्यान, २०२१ मध्ये कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) आणि २०२४ मध्ये केलीस एनधलोवू (झिम्बाब्वे अंडर-१९) यांनी टी२० फॉरमॅटमध्ये ५ चेंडूत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. ब्रेट रँडेलने आतापर्यंत ३८ प्रथम श्रेणी सामन्यांत २५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अद्याप न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नसले तरी, या जागतिक विक्रमानंतर निवडकर्त्यांचे लक्ष निश्चितच त्याच्याकडे वेधले गेले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kiwi bowler Brett Randell takes 5 wickets in 5 balls!

Web Summary : Brett Randell achieved a rare feat in New Zealand's domestic cricket, claiming 5 wickets in 5 balls in a Plunket Shield match. Randell's remarkable performance led Central Districts to victory, marking a historic moment in first-class cricket. He took 7 wickets for 25 runs in 11 overs.
टॅग्स :ऑफ द फिल्डभारत विरुद्ध न्यूझीलंडट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६