जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:25 IST2025-09-18T12:18:22+5:302025-09-18T12:25:53+5:30

whatsapp join usJoin us
kiron polard Picks MS Dhoni as Greatest Captain Ever | जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा पोलार्ड अजूनही अनेक नामांकित लीगमध्ये खेळत आहे. ३८ वर्षीय पोलार्डने कॅरेबियन संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु, जेव्हा त्याला जगातील सर्वात महान कर्णधार कोण आहे? असा प्रश्न विचारला गेला असता, तेव्हा त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले.

पोलार्ड काय म्हणाला?

"मी कधीही त्याच्यासोबत खेळलो नाही, पण क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या काही रणनीती पाहिल्या आहेत आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी मला खूप आवडल्या. मला खूप मजा आली. दुरूनच त्याचे कर्णधारपद पाहताना, त्याच्या रणनीती आणि इतर गोष्टी अनुभवताना मी खूप प्रभावित झालो. म्हणून, मी सहजपणे सांगू शकतो की, माझ्यासाठी, एमएस धोनी," असे किरॉन पोलार्डने एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले.

आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार

एमएस धोनी हा भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० विश्वचषक, विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकले. त्यानंतर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून जगावर छाप सोडली.  शिवाय, त्याच्या देखरेखीखाली भारतीय संघाने इतर अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केल्या. ज्यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे नाव आदराने घेतले जाते.

कॅरेबियन दिग्गजाने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताना पोलार्डने लिहिले की, "खूप विचार केल्यानंतर, मी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की अनेक तरुणांचे स्वप्न आहे. मी देखील १० वर्षांच्या वयापासून वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले आणि १५ वर्षांहून अधिक काळ टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही फॉरमेटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे."

Web Title: kiron polard Picks MS Dhoni as Greatest Captain Ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.