किंग्स पंजाब-राजस्थान रॉयल्स विजयासाठी लढणार!

किंग्स इलेव्हन पंजाब आज रविवारी आयपीएलमध्ये तळाच्या स्थानावरील राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार असून, या सामन्यात दोन्ही संघाचा विजयीपथावर पोहोचण्याचा निर्धार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:07 IST2018-05-06T01:07:03+5:302018-05-06T01:07:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kings Punjab-Rajasthan Royals to fight for victory | किंग्स पंजाब-राजस्थान रॉयल्स विजयासाठी लढणार!

किंग्स पंजाब-राजस्थान रॉयल्स विजयासाठी लढणार!

इंदूर - किंग्स इलेव्हन पंजाब आज रविवारी आयपीएलमध्ये तळाच्या स्थानावरील राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार असून, या सामन्यात दोन्ही संघाचा विजयीपथावर पोहोचण्याचा निर्धार आहे.
पंजाबला लागोपाठ दोन पराभव पत्करावे लागल्याने हा संघ आठ सामन्यात पाच विजय आणि तीन पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान तीन विजय आणि पाच पराभवांसह तळाच्या स्थानावर घसरला. पंजाब मात्र प्ले आॅफच्या शर्यतीत कायम आहे. काल रात्री होळकर स्टेडियमवर मुंबईकडून पराभूत झालेल्या पंजाबला राजस्थानविरुद्ध विजय मिळवून विजयी रुळावर परतण्याची आशा आहे. पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने कालही अर्धशतकी खेळी करीत टीकाकारांची तोंडे बंद केली.
कर्णधार रविचंद्रन अश्विन याने मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवाचे खापर फलंदाजांच्या नाकर्तेपणावर फोडले. पण पुढील सामन्यात उत्तम कामगिरीची ग्वाही दिली. राजस्थानच्या आशा जोस बटलर याच्यावर असतील. त्याच्या खेळीच्या बळावर विजय मिळेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. कर्णधार अजिंक्य रहाणे यालादेखील वेगवान खेळी करीत सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरावी लागणार आहे. राजस्थानला २२ एप्रिलला मुंबईविरुद्ध अखेरचा विजय मिळाला होता. तेव्हापासून हा संघ प्रतीक्षेत आहे. (वृत्तसंस्था)

सामन्याची वेळ : रात्री ८ पासून
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर

Web Title: Kings Punjab-Rajasthan Royals to fight for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.