Join us  

IPL 2020 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मोठ्या खेळाडूनं केलं रोहित शर्माला Unfollow, पण का?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:22 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली.  प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली आहे. त्यात बड्या नावांचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सनेही युवराज सिंगला डच्चू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, याच मुंबई इंडियन्सला धक्का देणारी घटना घडली आहे. आयपीएल 2020 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या एका बड्या खेळाडूनं चक्क कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पुढील मोसमासाठीच्या संघातून युवराज सिंगला वगळले. युवीसह मुख्यने एव्हीन लुईस, ॲडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरींदर सरन, बेन कटींग आणि पंकज जैस्वालला करारमुक्त केले. पण, मुंबई इंडियन्सनं ट्रेंट बोल्ट आणि धवल कुलकर्णी या दोन गोलंदाजांना ट्रेडमधून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) सर्वाधिक चार जेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. 

पण, संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डनं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केले. त्यामुळे बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्या दौऱ्यापूर्वीच पोलार्डनं असं केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक

ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबाद

वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :आयपीएल 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्सभारत विरुद्ध वेस्ट इंडिज