Join us  

टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 4:31 PM

Open in App

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज खलील अहमद याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यानं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात 22 जानेवारीला झालेल्या सामन्यात खलीलला ही दुखापत झाली. पुढील उपचारासाठी तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. 

भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात आतापर्यंत दोन वन डे सामने झाले आणि दोन्ही संघांनी एकेक विजय मिळवला आहे. 22 जानेवारीला झालेल्या सामन्यात खलीलनं 8 षटकांत 46 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या. त्या सामन्यात न्यूझीलंडच्या 230 धावांचा टीम इंडियानं 5 विकेट्स राखून सहज पाठलाग केला. मोहम्मद सीराजनं तीन, तर अक्षर पटेलनं दोन विकेट्स घेतल्या होत्या.

भारत अ संघानं 29.3 षटकांत 231 धावांचे लक्ष्य पार केले. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार खेळी केली. जिमी निशॅमनं भारत अ संघाला धक्का दिला. पृथ्वीनं 35 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार मारून 48 धावा केल्या. मयांकही 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल ( 30), संजू सॅमसन ( 39), सूर्यकुमार यादव ( 35) आणि विजय शंकर ( 20*) यांनीही फटकेबाजी केली. संजूनं 21 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 39 धावा केल्या.

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

Video: डिव्हिलियर्सची चौकार-षटकारांची आतषबाजी, 191.89 च्या स्ट्राईक रेटनं धु धु धुतले

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास...

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ