Kerala High Court Rejects Petition Against BCCI IPL Name : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठा दिलासा मिळाला आहे. जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) या नावासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) यांनी फेटाळून लावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या नव्या हंगामाआधी BCCI ला मोठा दिलासा
याचिकाकर्ते आशिक करौथ यांनी बीसीसीआयकडून या स्पर्धेसाठी ‘इंडियन प्रीमियर लीग’ या नावाचा वापर बेकायदेशीररीत्या केला जात असल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने या दाव्यात कोणताही ठोस आधार नसल्याचे स्पष्ट करत याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला. या निर्णयामुळे आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला असून स्पर्धेच्या आयोजनातील अनिश्चितता दूर झाली आहे.
हा युक्तीवाद निर्थक
मुख्य न्यायाधीश सौमेन सेन आणि न्यायमूर्ती श्याम कुमार व्ही.एम. यांच्या खंडपीठाने ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली. न्यायालयाने हलक्याफुलक्या शब्दांत निरीक्षण नोंदवताना म्हटले की, इतक्या वर्षांनंतर अचानक आयपीएल ही देशातील अधिकृत स्पर्धा नाही, याची जाणीव होणे आश्चर्यकारक आहे. या युक्तिवादात कोणताही ठोस आधार नसल्याचे सांगत न्यायालयाने ही जनहित याचिका पुढे चालवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.
चिन्नास्वामीवरच होणार RCB चे सामने
मागील वर्षी विजेतेपदानंतर झालेल्या गोंधळ आणि चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर यंदा बेंगळुरूमध्ये सामने होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कर्नाटक सरकारने अधिकृतपणे एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यांना हिरवा कंदील दिला आहे. गृह मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञ समितीने स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्था व तयारीबाबतचा अहवाल सादर केला असून सरकार त्याबाबत समाधानी आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारचे आभार मानत स्टेडियम पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले स्पष्ट केले आहे.
२८ मार्चपासून आयपीएल २०२६चा थरार
आयपीएलच्या १९व्या हंगामाची सुरुवात २८ मार्चपासून होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील उद्घाटन सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. घरच्या मैदानावर ‘चॅम्पियन’च्या थाटात उतरणारी आरसीबी यंदाच्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ ईशान किशनच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरेल.
Web Summary : The Kerala High Court dismissed a petition challenging BCCI's use of 'Indian Premier League,' providing relief before the new IPL season. The court found no merit in the claim that the name was illegally used. The IPL 2026 season starts March 28.
Web Summary : केरल उच्च न्यायालय ने 'इंडियन प्रीमियर लीग' के बीसीसीआई के उपयोग को चुनौती देने वाली याचिका को खारिज कर दिया, जिससे नए आईपीएल सीजन से पहले राहत मिली। अदालत ने इस दावे में कोई दम नहीं पाया कि नाम का अवैध रूप से इस्तेमाल किया गया था। आईपीएल 2026 सीजन 28 मार्च से शुरू होता है।