Join us

Virat Kohli in Legal Trouble: विराट कोहलीला झटका, केरळ उच्च न्यायालयानं पाठवली नोटिस 

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला केरळ उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 27, 2021 16:30 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला केरळउच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. ऑनलाईन रम्मी गेम्सचा सदिच्छादूत असलेल्या विराटसह अभिनेत्री तमन्ना आमि अजु वर्गीज यांना केरळउच्च न्यायालयानं नोटिस पाठवली आहे. या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि या गेममुळे तरुण पिढीला व्यसन लागत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. 

उच्च न्यायलयानं राज्य सरकारलाही नोटिस पाठवली आणि त्यांची प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. ऑनलाईन गेममधून पैसे गमावल्यानं अनेकांनी आत्महत्याचा केल्याचा दावा याचिकाकर्त्यानं उच्च न्यायालयात केला होता. त्यामुळे ऑनलाईन गेमवर बंदीची मागणी त्यानं केली आहे. २७ वर्षीय विनीथनं काही दिवसांपूर्वी तिरूवनंतपुरम येथील कुट्टीचल येथे आत्महत्या केली. त्यानं ऑनलाईन खेळात २१ लाख रुपये गमावले होते. 

३३ वर्षीय साजेश यानेही ऑनलाईन रमी गेममध्ये खूप पैसे गमावले. साजेश याने सांगितले की,''उच्च न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप केला, त्याचे स्वागत आहे. ऑनलाईन गेममध्ये अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मी स्वतः ६ लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. सदिच्छादूतांमुळे या अशा गेम्सकडे युवावर्ग आकर्षित होतो.'' 

टॅग्स :विराट कोहलीतमन्ना भाटियाकेरळउच्च न्यायालय