Join us  

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यानंतर शिखर धवननं खडसावलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:49 AM

Open in App

गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यानंतर आता टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याला खडसावलं आहे. आफ्रिदीनं रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच खरडपट्टी केली. यावेळी आफ्रिदीनं काश्मीर मुद्दा उपस्थित करून लोकांना भडकावण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या या विधानाचा गब्बर धवननं चांगलाच समाचार घेतला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत आहे.''

आफ्रिदीच्या या विधानानंतर गौतम गंभीर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी टीका केली. धवन म्हणाला,''सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे आणि तुम्हाला अजून काश्मीरची पडली आहे. काश्मीर आमचा होता आणि आमचाच राहणार. तुम्ही 20 करोड लोकं घेऊन या, आमचा एक लाखाच्या बरोबर आहे. आता तूच बेरीज करत बस.'' तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलंगंभीरने शाहिद आफ्रिची खिल्ली उडवत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला. गौतमने पाकिस्तानच्या या तिन्ही महाशयांचा उल्लेख जोकर म्हणून केला आहे. पाकिस्तानजवळ ७ लाख सैन्य असून २० कोटी लोकं या सैन्याच्या पाठीशी आहेत, असं १६ वर्षीय शाहिद आफ्रिदीने म्हटलंय. तरीही ७० वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, असे कडक उत्तर गंभीरने दिले आहे. आफ्रिदी, बाजवा आणि इम्रान खानसारखे लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विष पसरवण्याचा काम करतात. ज्यातून पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतमने आफ्रिदीचा गंभीरतेने समाचार घेतला. 

 

टॅग्स :शिखर धवनशाहिद अफ्रिदीगौतम गंभीरहरभजन सिंग