Join us

आजचा सामना : अनुभवी स्मिथच्या संघापुढे कार्तिकच्या नेतृत्वाची परीक्षा

केकेआरपुढे रॉयल्सचे कडवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 02:12 IST

Open in App

दुबई : कोलकाता नाईटरायडर्सला (केकेआर) जर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपली मोहीम योग्य मार्गावर आणायची असेल तर त्यांना फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध बुधवारी येथील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

रॉयल्सला सुरुवातीपासून छुपारुस्तम मानले जात आहे. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपल्या या गुणाची प्रचिती दिली आहे. हरियाणाचा अष्टपैलू तेवतियाने किंग्स इलेव्हनविरुद्ध गेल्या लढतीत ३१ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी करीत सामन्याचे चित्र पालटले, पण रॉयल्सच्या पहिल्या दोन विजयाचा हीरो केरळचा यष्टिरक्षक फलंदाज सॅमसन ठरला आहे. त्याने सलग दोन अर्धशतके झळकावली आणि त्याचा स्ट्राईक रेट २१४.८६ आहे. अशा स्थितीत केकेआरला रॉयल्सविरुद्ध विजयाची चव चाखायची असेल तर त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागले. मोर्गन व रसेल यांना केकेआर वरच्या क्रमांकावर पाठविण्याची शक्यता आहे.हरियाणाकडून खेळण्याचालाभ झाला : तेवतियायुजवेंद्र चहल, अमित मिश्रा, जयंत यादव या तीन राष्ट्रीय संघातील फिरकीपटूंसोबत हरियाणासाठी खेळण्याचा लाभ झाल्याचे एका षटकात पाच षटकार ठोकून पंजाबविरुद्ध ‘मॅचविनर’ ठरलेल्या अष्टपैलू राहुल तेवतियाने म्हटले आहे.वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३९ डिग्री सेल्सियस असू शकते. ह्युमिडिटी ३४ टक्के तर हवेचा वेग २१ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता.पिच रिपोर्ट । खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लाभदायक. प्रथम फलंदाजी करणाºया संघांनी सर्व पाचही सामने जिंकले. दोन सामने सुपर ओव्हरपर्यंत रंगले. जम बसल्यानंतर फलंदाज धावा फटकावू शकतात.

टॅग्स :आयपीएल