Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकमुळे रोहित बनला सलामीवीर; टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांचा खुलासा

खरे तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीच्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४६ धावा ठोकल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 05:42 IST

Open in App

नवी दिल्ली : २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये  महेंद्रसिंह धोनीने रोहित शर्माचा सलामीवीर म्हणून वापर केला. धोनीचा तो निर्णय सुपरहिट ठरला. पण त्यामागे रंजक कथा आहे.   दिनेश कार्तिकमुळे रोहितच्या फलंदाजीचा क्रम बदलण्यात आला होता. विशेष म्हणजे धोनीची ही रणनीती सुपरहिट ठरली आणि इतिहास घडला.

खरे तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीच्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४६ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे कार्तिकला फलंदाज म्हणून संघात कायम ठेवायचे होते. दिनेश कार्तिकला मधल्या फळीत ठेवण्यासाठी धोनीने रोहितला सलामीला पाठवले. धोनीचा हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला.

टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी हा खुलासा केला. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की ‘२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने निर्णय घेतला होता की रोहित डावाची सुरुवात करेल. सराव सामन्यात दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करीत होता, पण रोहितलाही संघात कायम ठेवायचे होते. 

टॅग्स :रोहित शर्मा
Open in App