Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'

IPL मध्ये भाव न मिळालेला मयंक कर्णधार कसा? हे आहे त्यामागचं कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:34 IST

Open in App

Vijay Hazare Trophy 2025- 26 Karnataka Squad  KL Rahul Play Under Mayank Agarwal Captancy : भारतीय नियामक मंडळाअंतर्गत (BCCI) घेण्यात देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटकच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसलेला लोकेश राहुल या स्पर्धेत IPL 2026 च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. KL राहुल शिवाय प्रसिद्ध कृष्णाही कर्नाटक संघाचा भाग आहे. यंदाच्या देशांतर्गत हंगामाआधी विदर्भ संघाची साथ सोडून पुन्हा घरवापसी केलेल्या करुण नायरलाही बढती मिळाली असून तो कर्नाटक संघाचा उप कर्णधार झाला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL मध्ये भाव न मिळालेला मयंक कर्णधार कसा? हे आहे त्यामागचं कारण..

IPL मध्ये एकाही फ्रँचायझीनं ज्याला भाव दिला नाही त्या मयंक अग्रवालकडे कर्नाटक संघाने नेतृत्व कसेल दिले? असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. आयपीएलमध्ये त्याला अनसोल्डचा टॅग लागला असला तरी त्याच्या नेतृत्वाखालील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या गत हंगामात कर्नाटकच्या संघाने जेतेपद पटकावले होते.  वेगवान गोलंदाज विद्वथ कावेरीप्पा आणि विद्याधर पटेल यांची नावे संघाच्या यादीत नसली तरी ते संघासोबत अहमदाबादला प्रवास करतील आणि सामन्यांसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती कर्नाटक वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अमित वर्मा यांनी दिली आहे.

अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय

कधी पासून रंगणार आहे ही स्पर्धा?२४ डिसेंबर, २०२५ ते १८ जानेवारी, २०२६ या कालावधीत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत कर्नाटकसह ३२ संघांचा समावेश असून ४ गटात प्रत्येकी ८-८ संघ अशा पद्धतीने संघांची विभागणी केली आहे.  

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटकचा संघ 

मयंक अग्रवाल (कर्णधार), करुण नायर (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, आर. स्मरण, के.एल. श्रीजित, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, व्ही. व्यशक, मानवंत कुमार, श्रीशा आचार, अभिलाष शेट्टी, बी.आर. शरथ, हर्षिल धर्मानी, ध्रुव प्रभाकर, के.एल. राहुल, प्रसिद्ध कृष्णा.

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul to play under Mayank Agarwal in Vijay Hazare Trophy.

Web Summary : KL Rahul will play under Mayank Agarwal, unsold in IPL, in the Vijay Hazare Trophy for Karnataka. Karun Nair is vice-captain. Agarwal led Karnataka to victory last season. The tournament runs from December 24, 2025, to January 18, 2026, with 32 teams participating.
टॅग्स :विजय हजारे करंडकबीसीसीआयलोकेश राहुलमयांक अग्रवाल