Karnataka into Final Of Ranji Trophy 2025-26 रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यातील सामना अनिर्णित सुटला असून कर्नाटकच्या संघाने ११ वर्षांनी फायनल गाठली आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ८ वेळच्या रणजी चॅम्पियन संघाने फलंदाजीतील आपली ताकद दाखवली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
लोकेश राहुलचा जलवा, कर्णधार देवदत्त पडिक्कलसह स्मरणची अवस्मरणीय कामगिरी
पहिल्या डावात कर्णधार देवदत्त पडिक्कल ३३२ (३३०) याने केलेल्या द्विशतकासह लोकेश राहुल १४१ (२११ ) आणि स्मरण रविचंद्रन १३५ (२१६) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकच्या संघाने पहिल्या डावात ७३६ धावा केल्या होत्या. डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ पहिल्या डावात २३३ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा स्मरण रविचंद्रन १२७ (१४९) आणि लोकेश राहुलचा ८६(१०३) क्लास दिसला. दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर कर्नाटकच्या संघाने जोरावर दुसऱ्या डावात ३२३ धावा करत उत्तराखंडसमोर ८२८ धावांचे तगडे आव्हान सेट केले होते. अखेरच्या दिवसाच्या खेळात उत्तराखंडच्या संघाने ६ बाद २६० धावा काढल्या.
जम्मू काश्मीरची ऐतिहासिक कामगिरी, बंगालला नमवून पहिल्यांदाच गाठली रणजीची अंतिम फेरी
फायनलमध्ये जम्मू काश्मीशी गाठ; कर्नाटकसाठी ही गोष्ट ठरेल जेमेची बाजू
दुसऱ्या उपांत्य फेरीतील लढतीत जम्मू काश्मीरच्या संघाने बंगालच्या संघाला पराभूत करत पहिल्यांदाच रणजी फायनलच तिकीट बूक केले होते. आता जेतेपदासाठी कर्नाटक विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात जेतेपदाची लढत रंगेल. जम्मू काश्मीर पहिल्यांदाच फायनल खेळत असल्यामुळे त्यांच्यावर निश्चितच दबाव असेल. दुसरीकडे कर्नाटकच्या संघाने याआधी ८ वेळा फायनल मारली असल्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. कर्नाटकच्या संघात टीम इंडियातील स्टार खेळाडूंचा भरणा आहे. याशिवाय फायनलचा सामना ते घरच्या मैदानात खेळणार आहेत. या गोष्टी कर्नाटकसाठी जमेच्या बाजू ठरू शकतात.
कधी आणि कुठं रंगणार रणजी स्पर्धेची फायनल?
कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी स्पर्धेतील फायनल सामना हा २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. हा सामना हुबळी येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.