OMG! भारतीय फलंदाजानं वन डेत झळकावलं त्रिशतक; 129 चेंडूंत चोपल्या 312 धावा, षटकारांचा पाडला पाऊस

लवनीथ सिसोदियाने कॉर्पोरेट वन डे सामन्यात खेळताना केवळ 129 चेंडूनत 200 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने तब्बल 312 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 2 डझनहून अधिक चौकार आणि षटकारांचा समावेश आहे. या खेळीत त्याने तब्बल 26 षटकारांचा आणि 26 चौकारांचा पाऊस पाडला. (Lavneeth Sisodia )

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 6, 2021 06:07 PM2021-02-06T18:07:30+5:302021-02-06T18:08:36+5:30

whatsapp join usJoin us
karnataka batsman lavneeth sisodia hits triple century in one day match scored 312 runs from 129 balls | OMG! भारतीय फलंदाजानं वन डेत झळकावलं त्रिशतक; 129 चेंडूंत चोपल्या 312 धावा, षटकारांचा पाडला पाऊस

OMG! भारतीय फलंदाजानं वन डेत झळकावलं त्रिशतक; 129 चेंडूंत चोपल्या 312 धावा, षटकारांचा पाडला पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक! विचार करूनच चक्कर येते. मात्र हो, असे घडले आहे. टोर्नामेंट कसेही असो, मग त्याला ICC अथवा स्थानिक क्रिकेट बोर्डाची मान्यता असो अथवा नसो. 50 षटकांच्या खेळात एखाद्या एकट्या फलंदाजाने ट्रिपल सेंच्युरी ठोकणे सोपे नाही. जर ते सोपे असते तर हा कारनामा सचिन तेंडुलकर, लारा, रोहित शर्मा, डिव्हिलियर्स, गेल अथवा सहवाग सारख्या धुरंधरांनी कधीच केला असता. मात्र, फक्त 21 वर्षांच्या कर्नाटकच्या फलंदाजासाठी हा डाव्या हाताचा खेळ ठरला. (karnataka batsman lavneeth sisodia hits triple century in one day match)

कर्नाटकचा डावखुरा फलंदाज लवनीथ सिसोदिया (Lavneeth Sisodia) याने एका कॉर्पोरेट वनडे टोर्नामेंटच्या सामन्यात आपल्या तिहेरी शतकाची स्क्रिप्ट लिहिली. वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक स्कोर 264 धावांचा आहे. हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितच्या या विक्रमाबरोबर लवनीथ सिसोदियाच्या या तिहेरी शतकाची तुलना नक्कीच होऊ शकत नाही. कारण, एक लोकल टोर्नामेंट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रेशर फार वेगळे असते. त्यांच्या क्वालिटिमध्येही मोठा फरक असतो. मात्र दोन्ही प्रकारच्या सामन्यांतील आग एकसारखीच असते.

129 चेंडू, 312 धावा, 26 षटकार -
लवनीथ सिसोदियाने कॉर्पोरेट वन डे सामन्यात खेळताना केवळ 129 चेंडूनत 200 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने तब्बल 312 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 2 डझनहून अधिक चौकार आणि षटकारांचा समावेश आहे. या खेळीत त्याने तब्बल 26 षटकारांचा आणि 26 चौकारांचा पाऊस पाडला. आता, एखाद्या संघाच्या केवळ एकाच फलंदाजाने एवढ्या धावा कुटल्यानंतर आणि समोरच्या संघाचे पार दिवाळे निघाल्यानंतर, तो संघ हारणार थोडीच! या सामन्यात लवनीथच्या संघाचा विजय झाला.

कर्नाटकातील उदयोन्मुख फलंदाज लवनीथ -
डावखुरा फलंदाज लवनीथ हा कर्नाटक क्रिकेटचा उदयोन्मुख खेळाडू आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 2019 आणि  2020 मध्ये तो कर्नाटक संघात होता. मात्र त्याला त्या वेळी आपल्या खेळाची छाप टाकता आली नव्हती. या विकेटकीपर फलंदाजाने नुकताच कर्नाटकच्या डिव्हिजन क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे.

मोठी खेळी खेळणे डाव्या हाताचा खेळ -
लवनीथला मोठी खेळी खेळायला आवडते. कॉर्पोरेट वन डे टोर्नामेंटमध्ये 312 धावा करण्यापूर्वीही त्याने 2018-19 मध्ये कूच बेहार ट्रॉफी मध्ये पंजाबविरुद्ध 234 धावा ठोकल्या होत्या.
 

Web Title: karnataka batsman lavneeth sisodia hits triple century in one day match scored 312 runs from 129 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.