वडिलांनी कारगिल युद्धात शत्रूला दाखवला होता हिसका, मुलगा क्रिकेटमध्ये करतोय धोनीसारखा धमाका!

भारतासाठी वडिलांनी कारगिल युद्धात सीमेवर आपली ताकद पणाला लावत देशासाठी मोठे योगदान दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:28 AM2019-08-30T11:28:55+5:302019-08-30T11:41:36+5:30

whatsapp join usJoin us
Kargil war veteran’s son could be next ms dhoni of indian cricket team | वडिलांनी कारगिल युद्धात शत्रूला दाखवला होता हिसका, मुलगा क्रिकेटमध्ये करतोय धोनीसारखा धमाका!

वडिलांनी कारगिल युद्धात शत्रूला दाखवला होता हिसका, मुलगा क्रिकेटमध्ये करतोय धोनीसारखा धमाका!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: भारतासाठी वडिलांनी कारगिल युद्धात सीमेवर आपली ताकद पणाला लावत देशासाठी मोठे योगदान दिले होते. तसेच आता मुलगा देखील भारताला आशियाई क्रिकेट चषक मिळवून देण्यास सज्ज झाला आहे. 

आग्रा येथे वास्तव्यास असलेला ध्रुव जुरेलचे वडील 1999मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेले कारगिल युद्ध लढले होते. त्याचप्रमाणे ध्रुव देखील भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत रंगणाऱ्या अंडर- 19  आशियाई चषक जिंकून देण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच ध्रुव भारतीय अंडर- 19 युवा संघाचे प्रतिनिधित्व देखील करणार आहे. तसेच ध्रुवचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आर्दश असून धोनी सारखी  विकेटकिपिंग आणि आक्रमक फलंदाजी करण्यास माहीर आहे. त्याचप्रमाणे ध्रुवने इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील अंतिम सामन्यात सलामी फलंदाज लवकर माघारी परतल्याने मधल्या फळीत सावध खेळी खेळून अर्धशतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला होता.

ध्रुवच्या वडीलांना त्याच्याप्रमाणे मुलगा देखील लष्करात सामिल व्हावा अशी इच्छा होती. परंतु ध्रुवने क्रिकेट क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच क्रिकेटमध्ये देखील देशासाठी काहीतरी करणार असल्याने त्यांनी ध्रुवच्या या निर्णयाला विरोध न करता स्वागत केले. ध्रुवच्या वडिलांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणटले की, देशासाठी काहीतरी करणे महत्त्वाचे आहे. मी कारगिल युध्दाच देशासाठी काही तरी करू शकलो. त्याचप्रमाणे माझा मुलगा देखील क्रिकेट खेळून भारतासाठी मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kargil war veteran’s son could be next ms dhoni of indian cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.