Join us

कॅप्टन कोहलीची सेलिब्रेटी फॅन, 'या' अभिनेत्रीला विराट वाटतो हॉट

कुठला क्रिकेटर सर्वात फिट वाटतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 11:20 IST

Open in App

मुंबई- अभिनेत्री करीना कपूर नुकतीच 'क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है' च्या सेटवर  'वीरे दी वेडिंग' सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. याच दरम्यान करीनाला काही प्रश्न विचारण्यात. त्यावर करीनानेही एकापेक्षा एक उत्तरं दिली. कुठला क्रिकेटर सर्वात फिट वाटतो? असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला. त्या प्रश्नावर करीनाचं उत्तर क्रिकेटचे चाहते व विशेष करून अनुष्का शर्मला खूष करणारं आहे. करीना सर्वात फिट वाटणारा क्रिकेटर म्हणून विराट कोहलीचं नाव घेतलं. 

'मला विराट कोहली खूप आवडचो. कारण तो खूप फिट आहे म्हणूनच मला तो हॉट वाटतो', असं उत्तर करीनाने दिलं. पण पुढे मला माझा नवाब जास्त आवडतो. केन विलियम्सही आवडतो तोही अतिशय हॉट आहे, असं करीना म्हणाली. 

करीना म्हणाली की, मला आधीच्या काळातील क्रिकेट आवडायची. तेव्हा या खेळाला जेंटलमन गेम समजलं जायचं. पण आता हा खेळ एक प्रकारे युद्ध बनला आहे, असंही करीना म्हणाली.  

टॅग्स :विराट कोहलीकरिना कपूर